पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ टिळकांची उलट तपासणी ५३ प्र० – रँड साहेबापेक्षा क्रॉफर्ड साहेब चांगला असे तुम्ही लिहिले? उ० - होय.. कारण कॉफर्ड साहेब लांच घेई पण निदान लांच घेऊन लोकांचे काम करी. प्र० – रँडसाहेब गावातून हिंडत फिरत नव्हते काय? उ०—-होय. ते हिंडत फिरत व पाहात. पण ते आपले धोरण बदलीत नसत. प्र० – त्याना करता आले तितके त्यांनी केले की नाही? उ० - पण तितकेहि करून लोकावर जुलूम झाला तर झाला म्हणू नये काय? प्र० - मग तर काय त्यानी तुमचेच ऐकावयाचे? उ० – माझे नाही. पण लोकांचे ऐकले पाहिजे होते. प्र०—कोणत्यातरी अधिकाऱ्याबद्दल तुम्ही चांगले लिहिले आहे काय? उ०- जेव्हा चांगले करतात तेव्हा चांगले लिहितो. पार्लमेंटात जसा तुमचा ठराविक विरोधी पक्ष असतो अशीच आमची वर्तमानपत्रे हिंदुस्थानातहि आहेत. म्हणून त्यांच्याकडे प्रायः टीकेचेच काम येते. त्याला काय करावे? डार्लिंग० – तुम्ही येथे आणलेल्या केसरीच्या अंकातून अधिकाऱ्याबद्दल एखादा तरी स्तुतीचा शब्द काढून दाखवाल काय? उ० – त्याला थोडे हुडकावे लागेल. डार्लिंग—तुम्हाला चांगला वाटलेल्या एखाद्या चांगल्या अधिकान्याचे स्मर णाने नाव घ्या पाहू? उ०- - लॉर्ड रे. प्र० - पण लॉर्ड रे काही प्लेगच्या वेळी नव्हते? उ० मला वाटले तुम्ही सर्वसामान्य विचारले. प्लेगच्या वेळी कोणीही चांगला अधिकारी नव्हता असे माझे मत आहे. प्र० – लोकाना दुःख झाले तरी रँड साहेबाना त्याची परवा नव्हती काय? उ० – त्याना वाटे की असे दुःख होणे स्वाभाविकच आहे. प्र०—पण असल्या तुमच्या भाषणाने कोणास चिथावणी मिळणारी नव्हती काय? होय. समजा तुमच्या मनात रँड साहेबाचा खून व्हावा असे आहे तर तसे घडून यावयाला तुम्ही कसे लिहाल? उ० - तसेच मनात येईल तेव्हा सुचेल तसे लिहीन. पण लिहिले तेव्हा काही मनात नव्हते खास! खून झाला तो जुलु- मामुळे झाला. जुलूम सोसावा लागल्यामुळे झाला. कोणी तो चवाट्यावर आणल्या- मुळे झाला नाही. प्र०—तुमच्या तक्रारी खऱ्या कशावरून? उ०- ० – प्लेग कमिशनच्या रिपोर्टात त्यांचा उल्लेख आहे. टि० उ... २१