पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ राष्ट्रीय सभेचा वाद १५ खोटी आहे. पण टिळकांचे उत्तर येण्यापूर्वीच समेट मोडून लोक मोकळे झाले. मागाहून टिळकावर केलेल्या आरोपाबद्दल त्यांची माफी मागण्यात आली. हा आरोप सभेचे अध्यक्ष भूपेंद्रबाबू यानीच केला व माफीहि त्यानीच मागितली. भूपेंद्रबाबू हे समैटाला मनातून अनुकूल होते ही गोष्ट मोतीलाल घोस यांजकडून वरचेवर कळत असे. पण याची वार्ता लागताच दिनशा बाच्छा यानी सुरेंद्र व भूपेंद्र याना अपमानास्पद तार पाठवून तुम्ही नेमस्तपक्षाचा विश्वासघात करीत आहा असे लिहिले. आणि फेरोजशहा मेथा यानी भूपेंद्रबाबूना अशाच अर्थाचे जे एक पत्र पाठविल्याचे पुढे प्रसिद्ध झाले त्यावरूनहि खरे पाणी मुंबईसच मुरत होते हीच गोष्ट सिद्ध झाली. मद्रासेस समेट घडला नाही तर पुढच्या साली काँग्रेस कलकत्त्याला बोलावून तेथे तो घडवून आणू असे भूपेंद्रबाबू कोठे बोलल्याचे कळ- ताच मुंबईकरानी हट्टाने पुढची सभा मुंबईसच मागून घेतली. गोपाळराव गोखले यावेळी आजारी असल्याने मद्रासेस जाऊ शकले नाहीत. पण समेट मोडण्याचा दोष त्यांच्याकडेहि पर्यायाने येत होता. बेझन्टबाई पुण्यास आल्या तेव्हा गोखले यानी एक मसुदा तयार करून त्यांच्याहाती दिला तो टिळकानी व बंगाल्यातील राष्ट्रीयपक्षाने मान्य केला होता. पण ता. १४/१५ डिसेंबरच्या सुमारास गोल- ल्यानीच भूपेंद्रबाबूस पत्र पाठवून टिळक सरकारवर बहिष्कार घालणारे आहेत असे कळविले. केसरीने आव्हान केले असताहि ते पत्र जसेच्या तसे गोखल्यानी प्रसिद्ध केले नाही. भूपेंद्रबाबूंची त्या पत्रावरून काय समजूत झाली हे मात्र त्यांच्या माफीवरून सिद्ध होते. गोखल्यांचे अस्सल पत्र प्रसिद्ध न करता ज्ञानप्रकाश वगैरे पत्रानी टिळकांच्या भाषणातील काही उतारे छापले पण ते १९०७ सालाइतके जुने होते. बरे, १९०७ सालची टिळकांची मते समेटाचा मसुदा लिहून देण्या- पूर्वीहि गोखल्याना माहीत होती. शिवाय बंगाल्यातील बहिष्काराला त्या प्रांतापुरता स्वतः गोखल्यानी दुजोरा दिला होता आणि १९०८ सालच्या एका व्याख्यानात निःशस्त्र प्रतिकारात मालावरील बहिष्कारापासून कर न देण्यापर्यंतच्या सर्व गोष्टीचा समावेश होतो असे स्वतः गोखल्यानीच म्हटले होते. या सर्व गौडबंगालाचा खुलासा मूळचे पत्र प्रसिद्ध करण्याने झाला असता; पण ते न करिता सुबराव यांच्याशी एका खासगी संभाषणात टिळक बहिष्काराविषयी बोलले होते असे गोखले यांचे तर्फे प्रसिद्ध करण्यात आले. पण सुवराव यानी टिळकांच्या भाषणाचा सारांश हाताने लिहून काढून दुसऱ्याच दिवशी टिळक व केळकर याना वाचून दाखविला होता. या टिपणात एक लिहून सुबराव हे गोखल्यांच्याजवळ टिळकां- संबंधाने दुसरेच काही बोलले असे समजण्याचा एकच मार्ग शिल्लक उरतो किंवा दुसरा मार्ग म्हणजे सुबराव बोलावयाचे तेच बोलले पण गोखले वेगळे समजले. ता. १६ फेब्रुवारीच्या अंकात टिळकानी आपल्या सहीने या वादाच्या विष- वर केसरीत एक पत्र लिहिले. त्यात त्यानी असे लिहिले की, " सुबराव व मी यांचे बोलणे झाले ते मुंबईस जाऊन मेथा वाच्छाशी चर्चा करून निराश होऊन