पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२ लो० टिळकांचे चरित्र चिरोल साहेबानी काढलेली अनुमाने बरोबर आहेत की नाही हे ज्यूरीला स्वतःच ठरविता येईल. भाग ४ - होय. प्र० – सभा व विनंत्या ह्याना तुम्ही पोरखेळ म्हटले आहेना? उ०—जेव्हा त्यांचा उपयोग नाही तेव्हा ते पोरखेळच. प्र० – पण या पलीकडे काय करावयाला हवे होते? उ०- -निःशस्त्र प्रतिकार. प्र० – म्हणजे काय? उ०—स्वतः दुःख सोसून प्रतिकार करणे. प्र०—स्वतः दुःख सोसण्याने प्रतिकार कसा होतो? उ० – धार्मिक भावनेने आपण दुःख सोसले म्हणजे इतरावर त्याचादि परिणाम होतो असे धर्मग्रंथात सांगितले आहे.

प्र० – 'दासानुदास ' ह्या सहीने एक पत्र छापले आहे. दासानुदास ह्याचा अर्थ पायाखाली तुडविला गेलेला असा नाही काय? उ० – " your obedient sor vant' यात जितक्या अर्थाने खरा विनय व्यावयाचा तितकाच 'दासपणा ' 'दासानुदास' ह्या शब्दातून काढावयाचा. your obedient servant ह्याचेच ते मराठी आहे. डार्लिंग – सर एडवर्ड कार्सन तुम्ही स्वतः पार्टमेंटला कधी एखादा अर्ज पाठविला काय? कार्सन–कधीच नाही. त्या अर्जाकडे कोणी ढुंकूनहि पाहात नाही. डार्लिंग-—अशा अर्जाच्या शेवटी " Your petitioners will ever pray असे असते. पण त्याप्रमाणे ते नेहमी प्रार्थना करीत बसतात काय? 23 कार्सन – आपण म्हणता ते खरे आहे. प्र० – केसरीतील पत्रव्यवहारातली मते तुम्हाला मान्य असतात की नाही? ज० -केव्हा असतात केव्हा नसतात. त्याचा अनुवाद केला तरच ती संमत सम- जावयाची असा नियम आहे. प्र० – लोकांच्या तक्रारी खोट्या नव्हत्या काय? उ० रँड साहेबांच्या टेबला- वरील बुकात ४०० तक्रारी नोंदलेल्या मी पाहिल्या त्या सगळ्याच खोट्या होत्या की काय? प्र० - -लोकाना दंड करून खजिना भरता येईल अशी टीका तुम्ही केली ती का? उ०—ती विनोदी टीका होती. थट्टा होती. प्र० - तुम्ही थट्टा केली असे ज्यूरीला सागता काय? उ०- -होय सांगतो. प्र० - प्लेगने दूषित वस्तू जाळाव्या की नाही? उ०-होय. पण वाटेल ती वस्तु? प्र० - चाफेकर व कान्हेरे दोघेहि चित्पावन होते? उ०–होय. प्र० – मुसलमान अत्याचार करितात हिंदु करीत नाहीत असे तुम्ही म्हटले काय? उ०–होय. ते कर्धाच अत्याचार करीत नाहीत.