पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भांग ४ टिळकांची उलट तपासणी ५१ प्र० - ज्या ओळी तक्रार न करिता तुम्ही सोडल्या त्या तुम्हाला मान्य आहेत? उ० – मान्य नाहीत. वकिलाच्या हातून त्या सुटल्या असतील. प्र० -वकिलाना त्या सोडाव्याशा वाटल्या असतील? उ०- -असेच काही नाही. प्र०—'अत्याचाराचे उद्गार शिवाजीच्या तोंडी घातलेले लेख टिळकानी छापले' अशा त्या ओळी आहेत त्याबद्दल तुम्ही फिर्याद केलेली नाही? उ० नाही. प्र० – खुनी चाफेकर आणि तुम्ही यांचेमध्ये फक्त प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित केला गेला नाही असे लिहिले आहे ते खरे काय? ज० ते शब्द तर खरेच आहेत. पण त्या शब्दातून लिहिणाराला जो इतर ध्वनि उमटवावयाचा होता तो खरा नाही. प्र० -प्लेगची तपासणी हा सोजीरांचा जुलूम असे तुम्ही वारंवार लिहिले नाही काय? उ० – होय. प्र० -चाफेकरानी तेच म्हटले होते? उ० – असेल. जे होते तेच त्यानी म्हटले. प्र०—जुलमाच्या म्हणून हकिगती लिहिल्या त्या खऱ्या होत्या काय? उ० – होय. प्र० – रँड साहेबानी जुलूम केला असे तुमचे म्हणणे आहे काय? उ०—-होय. प्र० – तुम्ही वर्तमानपत्नात लिहिलेले सिद्धान्त वाचून मी खुनाला प्रवृत्त झालो असे चाफेकरानी म्हटल्याचे चिरोल साहेबानी लिहिले त्याबद्दल तुम्हाला किती नुक- सान भरपाई पाहिजे. उ० – त्यानी तसे मुळी म्हटलेच नाही. डार्लिंग – टिळक म्हणतात मी लिहिले ते माझे सिद्धान्त नव्हेत तर घडलेल्या हकिगती. प्र० – पोलिस जुलूम करितात असे तुम्ही लिहिले काय? उ० - ज्या प्रकरणात ते लिहिले त्यात ते केले होते. प्र० – कोणते जुलूम? उ०—खोटा पुरावा तयार करणे. प्र० – पण तुम्ही न्यायाधीश होता की काय? उ०—मी न्यायाधीश नव्हतो. पण खटला चालू असताना हजर होतो. आणि पुराचा खोटा म्हणून न्यायाधीशाने आरोपीला त्या कामात सोडले. प्र० - लेगच्या अस्वस्थतेच्या वेळी असे लिहिणे बरे काय? उ० – हे प्लेगच्या वेळी लिहिलेलेच नाही. मलते भलत्यालाच लावता? उ० प्र०- प्लेग नसताना लोकाना घरातून बाहेर काढीत असे तुमचे म्हणणे काय? -प्लेग होताच. पण प्लेग असताना लोकाना घरातून बाहेर कसे काढावे यात फरक होताच की नाही? अधिकाऱ्यांनी अधिक दयाबुद्धीने वागावयाला पाहिजे होते. डार्लिंग– मला वाटते असा एक एक लेख घेऊन त्याचा अर्थ तसाच ना असे तुम्ही किती वेळ विचारीत बसणार? लेख वाचून दाखविले म्हणजे त्यावरून