पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो. टिळकांचे चरित्र भाग ४ प्र०- -दरबडेखोराला पोलिसानी प्रतिबंध केला तर त्यांनी लोकांच्या इच्छेविरुद्ध कृत्य केले असे म्हणावयाचे काय? उ० -असले कृत्य लोकांच्या इच्छेविरुद्ध मुळी असतच नाही. ५० प्र० - - इंग्रज हिंदुस्थानाला निरंतर ताबेदारीत ठेवतात काय? उ०—-होय. तसे दिसते आणि तसे म्हणणे बरोबरहि आहे. प्र० – अर्जदार लोकांचे हाल झाले असे तुम्ही लिहिले काय? उ०—तसे लिहिले होते.—होय. प्र०- तुम्ही अशा गोष्टी स्वतः पाहिल्या काय? उ० - मी स्वतः सगळ्या गोष्टी कशा पाहणार? अर्जदार लोकाना त्रास झाला सारावसुली कडक झाली ह्या गोष्टी प्रसिद्धच होत्या. प्र० – आणि असे लोकाना सांगितल्याने ते विथरणार नाहीत काय? उ०—लोकाना सरकारपासून मदत काय मिळते न मिळते हे सांगणे प्राप्तच आहे. ० – पण ही गोष्ट लहान नव्हती जोखमीची होती? उ०- -नसली म्हणून काय झाले? आहे ते जगापुढे मांडलेच पाहिजे. प्र० - दुष्काळी कारभारात सरकारचा कट होता असे तुम्ही म्हटले ते कशा- वरून? उ० – फॅमिन कोडात काही गोष्टी स्पष्ट लिहिलेल्या असता गव्हर्नर साहेबांच्या सगळ्या कौंसिलाने एकमताने त्याला विरोधी वर्तन केले म्हणून तो शब्द घातला. सायमन - दुष्काळातील खटल्यांचा तुम्ही उल्लेख केला. पण पुढे वाचलेत म्हणजे निरपराधी लोकावर खटले झाले होते हे दिसून येईल. डार्लिंग–थोडक्यातच आहे. वाचून टाका. उ० प्र० - शिक्षा करण्यासारख्या नसता मॅजिस्ट्रेटनी त्या केल्या असे तुमचे म्हणणे? - होय. मी मॅजिस्ट्रेटपुढे तक्रारीच्या वेळी हजर होतो. मॅजिस्ट्रेटनी सरकारची बाजू संभाळण्याचा आणि आरोपीला दोषी ठरविण्याचा हरप्रयत्न केला पण तो साधला नाही. दिवस चवथा - (१२ फेब्रुवारी १९१९) डार्लिंग – आज एक ज्यूरर आजारी आहे. तो येऊ शकत नाही. तुम्हाला ११ चालतील काय? कार्सन व स्पेन्स – होय. डार्लिंग——ठीक आहे. तर मग उलट तपासणी पुढे चालू द्या. प्र०-पेन्सिलने ह्या लेखावर मी खुणा केल्या आहेत. त्यासंबंधाने तुम्ही फिर्या- दीत तक्रार केली नाही? उ० – फिर्यादीत केली नाही. पण त्याला माझी हरकत आहे.