पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ टिळकांची उलट तपासणी तपासणीला मदत केली आणि प्लेगइस्पितळ काढले. स्वतः माझ्यावर जबाबदारी काही नव्हती, तरी मी कामहि करीत होतो व मदतहि करीत होतो. प्र० - तेव्हा दुष्काळहि होता? उ० – -होय. प्र० - त्यावेळी लोकाना तुम्ही चिथावले की नाही? उ० नाही. सारावसु- लीचे काही सरकारी नियम होते. ते लोकांच्या हिताचे असतात. सरकारने ते मरा- ठीत प्रसिद्ध केले नाहीत म्हणून मी केले. प्र० - मग तुम्ही फक्त नियम प्रसिद्ध करावयाचे होते? उ० – पूर्वीच्या अंकात ते म्हटलेच होते.

प्र० – मग ' वारांगनेव नृपनीति' असे म्हणण्याचे काय कारण? उ० -सर- कारी धोरणाला ती संस्कृत उपमा साजली म्हणून दिली. प्र० - पण ते शब्द संभावितपणाचे नव्हते? उ० – भाषांतरात तसे दिसते. पण मूळ संस्कृत तसे वाटत नाही. शाळातूनहि ते वाक्य शिकविले जात होते. प्र० – सरकार एक बोलून एक करिते असे तुमचे म्हणणे? उ० – होय त्यानी पुष्कळ वेळा तसे केलेच होते. प्र० - आणि हे इंग्रज लोकाबद्दल तुम्ही म्हणता? उ० – इंग्लंडातील इंग्रजा- बद्दल म्हणत नाही. हिंदुस्थानातील इंग्रजाबद्दल म्हणतो. प्र० – दुष्काळाला इंग्रज हे कारण असे तुम्ही म्हटले काय? उ०—नाही. प्र० - मी फिरून ते विचारतो. उ०- मी फिरून नाही म्हणतो. प्र० – रँड साहेबानी वाईच्या लोकाना शिक्षा अन्यायाने केली काय? -होय. उ० प्र० – आणि हेच ते गृहस्थ असे तुम्ही पुण्याच्या लोकाना सांगितले? उ०- खरे सांगायला चोरी कसली १ प्र० – रँड साहेब दयामाया दाखविणारे नव्हते असे तुम्ही लिहिले? उ० – ते लोकमत धाब्यावर बसवून स्वतःच्या मनचेच करीत हे प्रसिद्ध होते. प्र० – एखादी गोष्ट चूक असली तरीहि रँडसाहेब करीत? उ०- - होय. आप ल्याच म्हणण्याप्रमाणे ते करीत. ते अंमलदार होते आणि चांगलेच 'अंमल- दार' होते. प्र० - तुझी प्रत्येक गव्हर्नरला शिव्या देता काय? उ० – गव्हर्नर कोणी का असेना? प्रायः लोकाना अप्रिय व जुलुमाची गोष्ट घडली म्हणजे मी त्यावर टीका करितो. ५० - जुलमाचे कृत्य ह्याचा अर्थ काय? उ० – लोकांच्या इच्छेविरुद्ध कृत्य, मला वर्तमानपत्रात लोकांचे मत मांडावयाचे असते.