पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो० टिळकांचे चरित्र भाग ४ डार्लिंग—होय. पुरावा दाखल करिताना ती गोष्ट करावयाला पाहिजे होती. स्पेन्स – म्हणून माझे म्हणणे असे की ज्यूरीच्या कानावर असे निराधार खोटे उद्गार जाऊ देऊ नयेत. ४८ कार्सन – पण माझे म्हणणे कोर्ट ऐकून घेईल की नाही? डार्लिंग – तक्रार मी ऐकली आहे व मी निकालहि दिला आहे. कार्सन – ठीक. आणि मीही तो आदरपूर्वक स्वीकारला आहे. प्र०- तुमच्यावर अगदी प्रथम एक बेअब्रूचा खटला झाला होता? उ०- होय. प्र० - त्यात कोणी एका कारभाऱ्याने धन्याला विष घातल्याचा आरोप तुम्ही केला होता काय? उ० – नाही. त्याला वेड लावण्याचा व त्यामुळे त्याने विष घेण्याचा प्रयत्न करण्याचा तो आरोप होता, प्र० – ह्या खटल्यात तुम्हाला शिक्षा झाली? उ०—होय चार महिन्यांची झाली. प्र० – फिरून थोडे मागे जाऊन विचारतो. न्या. दावर ह्यांच्या निकालावर तुम्ही अपील केले काय? उ० – होय. प्रथम हायकोर्टाकडे नंतर प्रिव्ही कौंसिलकडे. डार्लिंग – दोन्ही कोर्टानी तुमच्याविरुद्ध निकाल दिला? उ० – होय. तसेच होते. प्र० – १८९७ साली तुमच्यावर खटला झाला त्यावेळी तुमच्यावर राजद्रो- हाचा आरोप होताना? उ०—-होय. डार्लिंग- -ह्या खटल्यात ज्यूरी होती काय? उ० – होय. प्र०—त्यात सगळे युरोपिअन होते काय? उ० – सहा युरोपिअन होते तीन हिंदी होते. सहानी माझ्याविरुद्ध निकाल दिला. तिघानी माझ्यातर्फे दिला. हिंदु- स्थानातील कायद्याप्रमाणे कोर्टाला बहुमताचा निकाल मान्य करिता येतो. [ येथे कोर्टातील लोक मोठ्याने हसले.] कार्सन – कोर्टाच्या मागील बाजूचे लोक हसले ते टिळकांचे पक्षपाती असा- वेत. पण हसणे हा संभावितपणा नव्हे व प्रश्नोत्तरात काही हसण्यासारखे नव्हतेहि. डार्लिंग – एकदा मी ताकीद दिली आहे. पुन्हा तसे घडले तर लोकाना कोर्टातून घालवून द्यावे लागेल. प्र० – १८९७त पुण्यात प्लेग फार होता? उ०- २ - होय. प्र०—प्लेगच्या बंदोबस्ताकरिता सरकारने गोरे शिपाई कामावर नेमले? उ०- होय. पण तसे करणे अवश्य नव्हते असे माझे मत होते. प्र० - पण तुम्ही काही सरकार नव्हता? उ० - होय ते तर उघड आहे. प्र० – अशा स्थितीत लोकांचा मनःक्षोभ करू नये अशी जबाबदारी तुमच्या- वर नव्हती काय? उ० – मी मनःक्षोभ केला नाही. उलट त्यांच्याबरोबर जाऊन