पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४७ भाग ४ टिळकांची उलट तपासणी प्र० – सगळ्या जातींचे एकमत झाले म्हणजे वाँव उडणार नाहीत? उ०- सगळ्या जाती एक झाल्या तथापि अनियंत्रित जुलुम होईल तरीही बाँच उडत राहतीलच. प्र० – एकाचा कोणाचा असंतोष झाला म्हणजे त्याने बेलाशक बाँव फेकावे काय? उ० – सगळ्या राष्ट्राच्या असंतोषाची गोष्ट आम्ही बोलतो. प्र० – मग व्यक्तिशः कोणाला बाँव फेकण्याचा अधिकार आहे की नाही? उ०—व्यक्तिकरिता कोणालाहि बाँव फेंकण्याचा अधिकार नाही. प्र० – सुराज्य झाले म्हणजे आमचे भागले असे म्हणणारा एखादा वर्ग हिंदु- स्थानात होता की नाही? उ०- हो आहे. नसायला काय झाले? प्र० - त्याना इंग्रजी राज्य हे दास्य न वाटेल तर त्यांनी स्वराज्य का मागावे? उ० - दास्य हा शब्द बरोबर नाही. गुलामगिरी असा मूळच्या शब्दाचा अर्थ नाही. प्र० – राजद्रोहात्मक भाषणामुळे बाँब होऊ लागले असे कित्येक लोक म्हणत की नाही? उ० – होय. तसे काही म्हणत. सायमन – पण त्याचे कारण असे की टिळकानीच केव्हा एखादे वेळी तसे लिहिले होते असे नाही. हे नित्यच सुरू होते. डार्लिंग–अनेकदा म्हटले तरी खरा अर्थ काय हाच प्रश्न आहे. प्र० -न्या. दावर तुमच्या संबंधाने बोलले ते ह्या लेखाना उद्देशून ना? उ० - होय. १ कार्सन – मी आता टिळकाना 'राष्ट्रमत' 'काळ व 'केसरी' ह्यातील लेखासंबंधी विचारणार आहे. तरी ते प्रश्न मला विचारता येतील का नाही या विषयी कोर्टाने मला निकाल द्यावा. राष्ट्रमत काळ व केसरी या सर्वांचा कट होता असे माझे म्हणणे. डार्लिंग - तसे करिता येणार नाही. कट होता हे आधी सिद्ध केलेत तर त्या कटाला अनुसरून ही तीन पत्रे एकमताने लिहित होती है तुम्हाला दाखविता येईल. पण अजून तसे सिद्ध झालेले नाही. कार्सन- पण ही तीन पत्रे एकंदरीने टिळकांचेच मत प्रतिपादन करणारी होती की नाही हे अखेर ज्यूरी ठरविणार आहे. डार्लिंग – पण आधी पुरावा होईल तर मग त्याविषयी ज्यूरी ठरविणार. म्हणून मला त्या दोन पत्रातील उतारे वाचून प्रश्न विचारण्याची तुम्हाला पर नगी देता येत नाही. स्पेन्स – मी थोडेसे ह्यात बोलू का? डार्लिंग—आधीच निकाल तुमच्यातर्फे दिला तरी बोलणारच का? स्पेन्स – मला इतकेच म्हणावयाचे होते की कैफियतीत किंवा कमिशनपुढे पुरावा घेतला त्यात प्रतिवादीने ह्या कटासंबंधाने एक अक्षरहि काढले नव्हते.