पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो० टिळकांचे चरित्र भाग ४ प्र० - लात एक किंवा अनेक अधिकारी आहेत असा अर्थ होतो काय? उ०–नाही. प्र० – बाँवला ज्ञानाचे स्वरूप अधिक असते ह्याचा अर्थ काय? उ० – - मूर्त स्वरूप दाखवून देता येते. ज्ञान दाखवून देता येत नाही. प्र०- म्हणजे ते अदृश्य असते असेच ना? उ० - होय. प्र० - बाँचला ज्ञान म्हणणे म्हणजे ती शिकविण्याची गोष्ट असेच की नाही? उ० – तसा त्याचा अर्थ होत नाही. डार्लिंग – एकंदर अर्थ असा दिसतो की बाँब ही वस्तु हुडकून काढण्याला कठीण. मोठ्या कारखान्यात तयार झालेल्या वस्तुसारखी ती नाही. - प्र० प्र० – बाँच करणे सोपे आहे? उ० - होय. फारच सोपे. त्याला फार पैसे लागत नाहीत. श्रम लागत नाहीत. हुडकून काढण्याला तो कठीण असतो. प्र० – म्हणजे काय? उ० – म्हणजे तो देशातून नाहीसा करायला कठीण. -म्हणजे काय? उ० -म्हणजे सरकारने अधिक काळजी घेतली पाहिजे. प्र० – हे तुम्ही सरकारच्या हिताकरिता म्हणून लिहिले काय? उ०- -लोकांच्या हिताकरिता म्हणून लिहिले व सरकारला असे असे आहे म्हणून असे असे करा असा उपदेश केला. बाँब हे रोगाचे लक्षण आहे असे मी सांगितले. झाडाला वरवर उपचार करून भागत नाही. त्याच्या मुळाशी उपचार करावा लागतो हे सांगण्याचा माझा हेतू. प्र० – सरकारला चाँबाविरुद्ध इलाज करिता येणार नाहीत असे तुमचे मत होते काय? उ० – इलाज करिता येईल. पण त्यांबरोबरच लोकामध्ये संतोष निर्माण न केला तर तो इलाज करणे अवघड इतकेच मला सांगावयाचे होते. प्र० – सरकारने नमावे नाही तर बाँव घ्यावे याहून दुसरा उपाय तुम्ही काही सुचविला काय? उ०-होय. इतर अनेक उपाय आहेत. स्फोटक द्रव्याचा कायदा हा एक इलाज. पण त्याबरोबरच लोकांचे दुःख निवारण करणे हा दुसरा. प्र० – म्हणजे सरकारने पडते घ्यावे असेच. की नाही? उ० – नेहमी पडते घ्यावे असेहि नाही. सरकार प्रबल व शक्तिवान् आहे पण सरकारने प्रजेचा संतोषहि राखला पाहिजे. प्र० - पण स्वराज्य देऊं नये असे सरकारला वाटले तर? उ० – ती त्यांची १ चूक होईल. लोक व सरकार यांचे वैमनस्य होईल. प्र०—म्हणजे बाँब उडत राहतील? उ० –बाँब उडत राहतील असा अर्थ नाही. असंतोष मात्र पसरत राहील येवढे खरे. - प्र० – हिंदुस्थानात किती जाती आहेत? उ० - सुमारे २०० असतील. प्र० -ह्यातील कोणाला स्वराज्य द्यावयाचे? उ०—सगळ्या जातीना मिळून.