पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ लो० टिळकांचे चरित्र भाग १ करणारे आहो हे जे लिहिले ते मात्र चिरोलसाहेबानी अजीबात गाळले. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांत पुणे येथे एक राजद्रोहाचा खटला झाला त्यांत सुर्वे देसाई व सुमंत असे गृहस्थ सांपडले. पैकी सुमंत यानी काही राजद्रोहात्मक वाङ्मय छापण्याचा इतर दोघाशी कट केला असा त्यांच्यावर आरोप होता. सुर्वे यांच्याजवळ बॉम्ब करण्याची कांही द्रव्ये व 'फॉर्म्युला' ही सापडली. या तिघानाही शिक्षा झाल्या. परंतु पूर्वीप्रमाणे या कटाचा आरोप चिघळविण्याचा पोलिसाकडून प्रयत्न झाला नाही. ऑगस्टपासून पुढे टिळक आपल्या गीतारहस्य ग्रंथाच्या खटपटीला लागले. त्यासंबंधाची हकीकत पुढे गीतारहस्य प्रकरणांत येईलच. पण हा त्यांचा उद्योग सुरू असताच आक्टोबर नोव्हेंबरात राष्ट्रीय सभेसंबंधी पुढे काय करा- वयाचे या प्रश्नाची वाटाघाट टिळक व त्यांच्या पक्षाची मंडळी तसेच परप्रांतांतील कांही मंडळी यांच्या दरम्यान सुरू झाली. ता. ५ जानेवारीच्या केसरीत टिळकानी मद्रास काँग्रेसवर लेख लिहिला त्यात समेटाला खरी अडचण काय होती हे विशद करून सांगितले. उभयपक्षाच्या ध्येयात फरक नाही. प्रतिज्ञा पत्रकावर सह्या करण्यालाहि काही लोक तयार झाले. पण खरी अडचण मुंबईच्या पुढाऱ्याच्या मनातच होती. 'घोडे अडते मुंबईस त्याला कोणी लगाम घालणारा भेटल्याखेरीज ते असेच उधळत अडत लाथा मारीत राहणार.' मुंबईकरांचे हे धोरण देशात किती मान्य होते या गोष्टीचे प्रत्यंतर म्हणजे मद्रास सभेतील सव्वासहाशे डेलिगेटापैकी बाहेर प्रांतातून फक्त १२५ आले होते. आणि त्यातलेहि शंभर मुंबई व बंगाल्यात वाटले गेले होते. स्वतः बेझन्टबाईनीच म्हणून दाखविले की ही काँग्रेस सर्व पक्षाची नसून फक्त एका पक्षाचीच मजलीस आहे. ही दुःस्थिति स्वतः काँग्रेसच्या नजरेला येऊन समे- टाचा प्रश्न सोडविण्याकरता प्रत्येक प्रांताचे तीन तीन लोक घालून एक कमिटी नेमण्यात आली. व पुढील साली मुंबईस राष्ट्रीय सभा भरेल त्यापूर्वी हा प्रश्न सुटावा अशी इच्छा व्यक्त करण्यात आली. आळतेकर व उपासनी हे दोघे मद्राः सच्या सभेला गेले होते त्याना विषयनियामक कमिटीत मुद्दाम घेण्यात आले म्हणून या प्रभाला जास्त नेट लागला. मद्रासच्या सभेहून लोक व वर्तमानपत्रकर्ते आपा- पल्या गावी गेल्यावर समेटाचा प्रश्न कसा फसला याविषयी सहजच चर्चा सुरू झाली. १२ जानेवारीच्या अंकात अमृतबझार पत्रिकेने खालीलप्रमाणे लिहिले, 'टिळक राष्ट्रीय सभा पुढे मागे कवज्यात घेतील म्हणूनच समेट मोडण्यात आला. मुंबईकडील एका मवाळ पुढाऱ्याने मद्रासच्या स्वागतमंडळाला एक 'गुप्त' स्वरू- पाचे पत्र लिहिले. पण ते विषयनियामक कमिटीत प्रगट करणे भाग पडले. त्या पत्रात असे लिहिले होते की टिळकानी "सरकारावर बहिष्कार" घालण्याचा आपला उद्देश प्रगट केला असून ते राष्ट्रीय सभेत शिरतील तर आयरिश लोकांचे अड- वणुकीचे मार्ग पुढे आणतील. हे ऐकल्याबरोबर बेझन्टबाईनी टिळकाना ता करून विचारले की, हे काय आहे ? टिळकानी ताबडतोब उत्तरी कळविले की ही गोष्ट