पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ टिळकांची उलट तपासणी ४३ प्र०—बरे, बंगालची फाळणी म्हणजे काय? उ० – एका राष्ट्राची दोन शकले करणे. प्र० – ह्या फाळणीमुळे बाँच निर्माण झाले काय? उ० -होय. फाळणीच्या तक्रारीमुळे. प्र० – आणि तक्रारी होत्या म्हणून बॉम्ब योग्य होते? उ० –बॉम्ब हा तक्रा- रीचा परिणाम. पण झाले ते योग्य असे मात्र नव्हे. प्र० – सैन्य आणि आरमार यांचेशी लढणे म्हणजे काय? उ० – युद्ध बंड असा त्याचा अर्थ होईल. प्र० - भौतिक शास्त्राने सैन्याला जी सत्ता येते तिचा नाश बॉम्बगोळ्याने करिता येतो याचा अर्थ काय? उ० – एकाच शास्त्राचे ज्ञान दुसऱ्यालाहि असले म्हणजे ते त्याचे त्याजवर उलट चालविता येते हाच त्याचा अर्थ. प्र०- -सोजीर लोक घरात शिरले व बायकांची बेअब्रू केली तर त्यांचेवर बॉम्ब फेकावे? उ० – सामान्य राज्यव्यवस्थेशी त्याचा संबंध नाही. राष्ट्राराष्ट्राच्या युद्धा- संबंधाने ते लिहिलेले होते. इंग्रजी वर्तमानपत्रातहि असल्या गोष्टी दिल्या आहेत. प्र० – खून झाला म्हणूनच तक्रारी मिटल्या आणि प्लेग व्यवस्थेत फरक पडले? उ० – नाही. व्यवस्थेत फरक झाले ते पुढे कमिशन नेमल्याने, प्र० – रँडचा खून हे अराजकाचे कृत्य म्हणावयाचे काय? उ० – होय. प्र० - मग अराजक कृत्य करून राज्य मिळवावे असे तुमचे मत १ उ०- नाही. अशा गोष्टींचा उपदेश मी केव्हाच केला नाही. डार्लिंग – खून झाल्यापासून या गोष्टी थांबल्या. याचा अर्थ खुनामुळे असा की नाही? उ० – तेव्हापासून याचा अर्थ कार्यकारण भावाचा नाही. तेव्हापासून हे शब्द फक्त कालदर्शक आहेत. प्र० -अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याला खून एवढाच उपाय आहे काय? उ० – त्या लिहिण्याचा तसा अर्थ नाही.

प्र० – इंग्रजी वर्तमानपत्राना तुम्ही Blaggards हे विशेषण लाविले आहे की नाही? उ० - -होय. पण तो त्यांचा त्यानाच परत आहेर केला. प्र० - असले वृथा दोषारोप इंग्रजी पत्रे करितात काय? उ० टाईम्स ऑफ इंडियाने मजवर १८९७ साली केला होता. - - होय. खुद्द प्र० – टाइम्स पत्रावर तुम्ही इलाज केला होता काय? उ० – ह्या प्रसंगी असला इलाज करण्याकरिता मी मुंबईस गेलो होतो. पण मला त्याच दिवशी पकडण्यात आले. - प्र०—- मागाहूनहि इलाज केला नाहीत? उ० – तुरुंगात कसा करू? सुटून आल्यावर केला.