पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ लो० टिळकांचे चरित्र प्र० - हे वाचून पुण्यातील लोकावर काय परिणाम होईल? उ०- यात काय संबंध? पुण्याचा प्र०—अधिकाऱ्यांचा हुकूम जुमानू नये ज्यूरी व जज्ज यांचा निकाल मानू नये अशी तुमची शिकवण होती काय? उ०- -नाही. भाग ४ प्र० – वर्तमान पत्रात लेख लिहिणाराचे नाव सांगू नये असे तुमचे मत होते काय? उ० – होय. टाईम्स पत्रानेहि एक वेळ तसे केले होते. प्र० – काळ्या लोकाना न्याय मिळत नाही असे तुम्ही म्हटले काय? उ०- काळ्या गो-यांच्या वादात काळ्याना न्याय मिळत नाही असे माझे मत होते. गोन्याला ५० रुपये दंड होतो. त्याच गोष्टीकरिता काळ्याला सहा महिन्यांची शिक्षा होते हे मी दाखविले आहे. प्र० – न्यायदानाविरुद्ध तक्रारी करणे म्हणजे लोकाना अधिकाऱ्याविरुद्ध चिथावणे होते की नाही? उ०—नाही. तसे होते म्हटले तर कोणत्याहि न्यायाविरुद्ध तक्रार करणेच गैर होईल. डार्लिंग–पण टाईम्सकारानी नकार अंगिकारला तरी शेवटी तार दाखल केलीच की नाही? प्र० - किंग्जफर्ड मॅजिस्ट्रेटला तुम्ही नावे ठेविली त्यावेळी बॉब उडत होते की नाही? आणि ते उडण्यात धोका होता की नाही? उ०- -तिकडील वर्तमान पत्रावरून तसे दिसत होते. प्र० – बाँबचा धोका तुम्हाला कळत होता की नाही? उ०- -सर्वानाच कळत होता. बुद्धिवान = प्र० - तुमच्यावर ह्या बाबतीत मोठी जबाबदारी होती की नाही? उ० – होय. -बाँचगोळ्याच्या गुन्हेगाराची तुम्ही स्तुति केली नाही काय? उ० – नाही. मी या लेखात निरनिराळ्या गुन्हेगारांची तुलना करीत होतो. प्र० प्र० – पण तुम्ही मोठे बुद्धिवान आहा? उ०- हिंदुस्थानात शेकडो आहेत. - माझ्यासारखे प्र० -' बाँगोळ्याचे रहस्य' या लेखाबद्दल तुम्ही जबाबदार आहात की नाही? उ० – संपादक म्हणून मी जबाबदार आहे. पण तो लेख मी लिहिलेला नाही. अराजकाचा सिद्धांत काय असतो एवढेच त्यात सांगितले होते. प्र० - रँडसाहेबाना तुम्ही नावे ठेविली? उ० – होय. मी त्यांच्यावर टीका करीत होतो व त्याच वेळी त्याना मदतहि करीत होतो. प्र०- -रँडसाहेब दुर्मुखलेले होते नाही? उ० – होय मला ते तसे दिसत. प्र०—प्लेगच्या व्यवस्थेत त्यानी जुलूम केला म्हणून त्यांचा खून झाला असेच तुमचे मत ना? उ० – होय. -