पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो० टिळकांचे चरित्र प्र० – तुमच्यावरील टीका १८९७ त आणि इलाज १८९९ त? उ० – पण इलाज केला तो १८९७ तील लेखाकरिता आणि फिरून त्यानी तसाच लेख लिहिला होता म्हणून. ४४ भाग ४ - प्र० - टाइम्सनी मागितलेली माफी तुमचेजवळ आहे काय? उ०- -होय. प्र० - बाँबबद्दल सरकार जबाबदार आहे असे तुम्ही म्हटले काय? उ०- जुलुमामुळे लोक निराश होतात आणि निराशेमुळे बाँब होतात असे म्हटले आहे. प्र० – इंग्रजसरकार लष्करी सत्तेने मदांध झाले म्हणून बाँब पुढे आले असे तुम्ही म्हटले काय? उ० – होय. तो स्वाभाविक परिणाम झाला असे म्हटले. सायमन – टाइम्सने टिळकांची मागितलेली माफी ही येथे आहे. कार्सन – त्या प्रकरणात तुम्हाला येथे शिरावयाचे आहे काय? सायमन – मघाशी तिचा उल्लेख आला होता म्हणून मी ती हजर केली. प्र० - -'देशाचे दुर्दैव' हा लेख पहा. गोऱ्या अधिकाऱ्यांच्या जुलुमामुळे आणि दुराग्रहामुळे बाँब होतात असे तुम्ही लोकास शिकविले काय? उ० – ते माझे मत मी सांगितले. लोकास तसे करण्यास शिकविले नाही. प्र० - तुम्ही बाँचगोळ्याची संभावना केली? समर्थन केले? उ० – समर्थन केले नाही. झाली दिसली गोष्ट सांगितली. एकामागून एक गोष्टी घडत आल्या त्याच मी सांगितल्या. प्र० – रशियात हिंदुस्थानापेक्षा बाँव उडविण्याला कमी सबब होती असे तुम्ही सांगितले काय? उ०- मी इतकेच दर्शविले की हिंदुस्थानात परकी राज्य तरी आहे. रशियात त्या देशातील लोकांची सत्ता आहे पण अनियंत्रित आहे इतकेच. निरनिराळ्या देशात निरनिराळ्या परिस्थितीत अत्याचार कसे झाले याची कार्यकारणमीमांसा मी या लेखात सांगितली होती. त्यात राज्यकर्त्यानी बोध घेण्याची जशी मी सूचना केली तशीच अत्याचारी लोकानाहि पण त्यांच्या कृत्याच्या परिणामाचा बोध घेण्याची सूचना केली होती. प्र० - जुलमी सरकाराविषयी तुम्ही लिहिलेत त्यात इंग्रजी राज्याचा समावेश होतो काय? उ० – सगळ्या जुलमी राज्यांचा समावेश होतो. परंतु कोणाचा उल्लेख विशेष अभिप्रेत आहे हे परिस्थितीवरून ओळखावयाचे असते. ब्रिटिश अधिकारी जेव्हा तशी सत्ता गाजवित असतील तेव्हा त्यानाहि तो लागू म्हणता येईल. मागची पुढची वाक्ये पाहिली म्हणजे कळून येते. लोकासंबंधी लिहिताना मी आयरिश लोकांचेहि उदाहरण दिले आहे. कार्सन—ते असो म्हणा. येथे काही आम्ही आयरिश राष्ट्राचा न्याय करा- वयास बसलो नाही. प्र० – बंगालच्या फाळणीमुळे बाँच उडाले काय? उ० – होय. तुमच्या आय- लैंड आलस्टरमध्ये झाले तसेच इकडे झाले.