पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टिळकांची उलट तपासणी ४१ त्यावर सह्या करण्याला तयार होतात आणि हे सगळे अधिकाऱ्यांची कारवाई असते म्हणून घडते. भाग ४ L प्र० - तुम्ही राजनिष्ठ आहा की नाही? उ० – वादशहा व साम्राज्य ह्यांच्या संबंधाने मी राजनिष्ठ आहे. प्र० – मग त्यानी सह्या केल्या त्यात काय चुकले? उ० – अधिकाऱ्यांच्या कारवाईला बळी पडले म्हणून! मनांत नसलेल्या गोष्टीवर सह्या करणे ह्यात काय अर्थ? प्र० – मग काय त्यानी अराजनिष्ठ व्हावयाचे? उ० -जुलुमाला प्रतिकार करावयाचा. प्र० – सरकारच्या जुलुमाला? उ० – नाही अधिकाऱ्यांच्या जुलुमाला. प्र०—कसेहि असले तरी तो राजनिष्ठेचाच जाहीरनामा ना? उ०- -जुलूम होत असता तो होत नाही असे दाखविण्याकरिताच तो जाहीरनामा काढला म्हणून वाईट! हिंदुस्थानात अशा वेळी असे जाहीरनामे काढणे योग्य नव्हते. प्र० – तुम्ही स्वतः असे कधी करणार नाही काय? उ० – मी असे कधी केले नाही व मला ते आवडतहि नाही. प्र० – पण अराजनिष्ठेबद्दल तुम्हाला दोनदा शिक्षा झाली आहे? उ०—कोर्टाने शिक्षा दिली म्हणून मी काय खरा गुन्हेगार की काय? प्र० –' लोकानी स्वराज्याचे हक्क मिळविण्याकरिता जिवाचीहि परवा केली नाही. ' या लेखाला तुमची संमति होती काय? उ० – होय. निःशस्त्र प्रतिका- राने ही गोष्ट केली तर त्याला माझी संमति होती. प्र० –लोकानी कायदा मोडला तरी तुम्ही असे म्हणणार काय? उ०- असे केल्याशिवाय वाईट कायदा रद्द होऊ शकत नाही. प्र० - ह्या एका खटल्यात पाल यानी पुरावा देण्याचे नाकारले. त्यावेळी तुम्ही त्याना बरे म्हटले की नाही? उ० – तो खटला सार्वजनिक स्वरूपाचा होता म्हणून मी तसे म्हटले, प्र० - मग कोणत्याही सार्वजनिक खटल्यात पुरावा देऊ नये असे तुमचे म्हणणे की नाही? उ० – हे ज्याचे त्यानेच ठरवावयाचे असते. -होय. त्यास प्र० साक्षीदाराने खोटे सांगितले तरी चालेल? उ० – त्यानी वाटेल तर गप्प बसावे व त्याचा परिणाम सोसावा. प्र० – ह्या खटल्यात तुम्ही ती गोष्ट पसंत केली काय? उ०- तशीच कारणे होती म्हणून. डार्लिंग–पॅस्कल ह्याच्या सुप्रसिद्ध पत्नात एकच गोष्ट अनेक रीतीनी कशी करिता येते हे दाखविले आहे!