पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४० लो० टिळकांचे चरित्र भाग ४ -गोरे अधिकारी म्हणजे सरकार असेच नव्हे काय? उ० – त्यात मी प्र०- भेद करितो. प्र० – पण सरकार म्हटले म्हणजे त्यांचे अधिकारी असणारच? मग सरकार व अधिकारी यात काय भेद? उ० –भेद अलवत आहे. का नाही? एका घरात अनेक खोल्या असतात. म्हणून काही एक एक खोली म्हणजे घर नव्हे! डार्लिंग—बंगाली लोकाना तुम्ही वानरे किंवा माकडे म्हटले काय? प्र० – त्याना माकडे म्हटले नाही. पण वानरानी पूर्वी रामायणात पराक्रम केला त्याचा मात्र मी दाखला दिला होता. प्र०—गोरे अधिकारी गरीब बिचाऱ्या लोकाना पायाखाली तुडवितात असे तुम्ही लिहिले काय? उ०—- होय. प्र० – हिंदुस्थानचे स्वराज्य तुम्ही मागितले काय? उ० – हिंदुस्थानचे नाही ब्रिटिश साम्राज्यातले. प्र० - पंजाबात तुरुंगात गेलेल्या लोकांची स्तुति तुम्ही केली काय? उ०- - होय. कार्सन – आता ह्या लेखाकडे पाहा. सायमन – त्याना काळातले लेख दाखविता तसा टाइम्सही दाखवा. दोहोशी ह्यांचा संबंध तितकाच. (येथे काळ पत्रातील काही लेख खुणा करून न्या. डार्लिंग ह्यानी टिळकाना आपल्याशी वाचावयास दिले). प्र० – ते वाचून सांगा. पिंडीदास दिनानाथ ह्याना शिक्षा झाली होती की नाही? सायमन – त्याला माझी हरकत आहे. प्र०—आता सायमनसाहेब आणखी काय काय सोंगे आणणार कोणास ठाऊक? सायमन – अहो उगीच रागावण्यात काय अर्थ? कार्सन–मी रागावलेलो नाही व तसे म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही. डार्लिंग - - पण तुम्ही दोघे मला उद्देशून बोलणार की एकमेकाना? सायमन—मी हरकत घेईन तेव्हा ह्यानी गप्प बसले पाहिजे, कार्सन - होय मी गप्प बसतच होतो. डालिंग – तर मग आता फिरून गप्प बसा पाहू. सायमन – माझे म्हणणे इतकेच होते की ज्यूरीला ऐकू जाईल अशा रीतीने उपहासाचे शब्द एका वकिलाने दुसऱ्या वकिलाला बोलू नये. डार्लिंग – पण बुवा मी तरी काही ते शब्द ऐकले नाहीत! कार्सन–बरे यापुढे मी तुम्हाला आमचे नेक नामदार स्नेही असे म्हणत जाईन मग तरी झाले ना? प्र० – पंजाबातील काही लोकानी राजनिष्ठेचा जाहीरनामा काढला त्यामुळे पंजाबची अब्रू गेली असे तुम्ही म्हटले १ उ०—लोकाना शब्दशः पसंत नसता अशा गोष्टी लिहवून अधिकारी जाहीरनामा काढवितात आणि काही भले लोक