पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ 'टिळकांची उलट तपासणी ३९ सायमन – माझी ह्याला हरकत आहे. वाटेल त्या पुस्तकातील भाग वाचून दाखवून काय उपयोग? कार्सन – ह्या पुस्तकाची शिफारस केसरीच्या वाचकाना टिळकानी केली म्हणून ते पुस्तक वाचले असे कान्हेरे सांगतो म्हणून! व हे पुस्तक त्याना अर्पण केले आहे म्हणून! डार्लिंग – पण म्हणून काय झाले? परवानगीने व परवानगीशिवाय अशी पुष्कळ पुस्तके कोणी कोणाला अर्पण करितात. पुस्तक अर्पण केले म्हणजे पुस्त- कातील विचार ज्याला ते अर्पण केले त्याचे होते असे होत नाही अशी टिळकांची तक्रार आहे त्याचे काय? कार्सन- - पण त्यानी त्याची शिफारस केली होती. डार्लिंग – पण मला वाटते हा तुमचा प्रश्न मर्यादेच्या बाहेर जातो. तुम्ही हा विचारू नये. प्र०—बाँब गोळ्यावर लेख लिहिण्याच्या आधी तुम्ही हे पुस्तक वाचले होते काय? उ० – या पुस्तकाचा काय संबंध व जरूरी तरी? मॅझिनीचे इंग्रजी चरित्र मी पूर्वी कधी वाचले होते. शिवाय बाँब गोळ्यावरचे लेख स्वतः मी लिहिले नव्हते. प्र० ह्या पुस्तकावर केसरीने टीका केली होती काय उ० – माझ्या स्मरं- णात नाही. डार्लिंग – तुमच्या चालू प्रश्नातील किती विचारू द्यावे किती न द्यावे हे थोडे भानगडींचे आहे. उ० – मी भानगड न होऊ देता खुलासा करितो. दोन्ही सावर- कर बंधूंना तुम्ही बेकायदेशीर मार्गानी जाऊ नका असाच उपदेश मी करीत होतो. प्र० – मग ते भयंकर लोक होते हे तुम्हाला माहित होते? उ० – -भयंकरच नव्हे पण तापट होते. प्र० – आणि बेकायदा वर्तन करण्याचाहि संभव? उ०-होय, प्र० – 'बंगाली बंधूनो भले केले' असे तुम्ही १९०८ साली लिहिले आहे. तर 'भले' म्हणजे काय? उ०—स्वदेशी चळवळ हाती घेतली हे. प्र० - 'बंगाली लोकानी राजद्रोहाचे गुन्हे केले' हे भले केले काय? उ०- तसे नव्हे. खोटे खटले त्यांच्यावर झाले असता त्यानी धैर्याने आपला बचाव केला हे. कारण पूर्वी त्याना लोक भ्याड व मिते म्हणत असत. प्र० – रावण म्हणजे काय? उ० – तो एक अनार्य राक्षस होता. प्र० – राम हा कोण? उ० – तो एक आर्यन देवाचा अवतार होता. प्र० – एखाद्याला कायदा चांगला वाटला नाही तर त्याने तो मोडावा की नाही? उ० –मोडावा. पण शिक्षा निमुटपणे सोसावी. ह्याचेच नाव Passive resistance.