पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ लो० टिळकांचे चरित्र प्र० - रसायन शास्त्र? उ० नाही. प्र० - पिकरिक अॅसिड? उ० – तो विषय मलाहि माहित नाही. भाग ४ प्र० - पिकरिक अॅसिडचा उपयोग काय हे तुम्हाला माहित आहे काय? उ०—वर्तमानपत्रातून वाचला होता. प्र०- -परांजपे व तुम्ही नाशकास केव्हा एकत्र होता काय? (मजकूर वाचून दाखविल्यावर) उ० – होय. प्र० - तुमच्या समक्ष विलायती कापडाची तेथे होळी केली? उ०—प्र० - सर्व देशभर होळ्या केल्या काय? उ०–नाही. -होय. - डार्लिंग – टिळक व परांजपे यांच्या नाशकाच्या मुक्कामाच्या वर्णनात 'काली' हा शब्द आला आहे ती काली म्हणजे काय? उ० -काली ही शंकराची पत्नी. प्र०—दोन्ही विध्वंसाच्या देवता ना? उ० – होय. कार्सन – एक विध्वंसाचा राजा व दुसरी विध्वंसाची राणी! दिवस तिसरा - (३१ जानेवारी १९१९) प्र० – मॅझिनीचे एक चरित्र त्याच्या कर्त्यांने तुम्हाला व परांजप्याना मिळून अर्पण केले होते काय? उ० – होय. प्र० - तुम्ही केसरीचे संपादक असता त्या ग्रंथाचे परीक्षण तुम्ही केसरीत केले होते? उ० – होय. केसरीत परीक्षण आलेले आहे. पण ते मी लिहिलेले नाही. ते छापून झाल्यावर मी पाहिले. प्र० - लाला लजपतराय ह्यांची व तुमची ओळख होती काय? उ० – -होय. प्र० – त्याना हद्दपार केले होते काय? उ० – होय. प्र० - कशाकरितां? उ० – राजद्रोहाकरिता. प्र० – लोकमान्य म्हणजे काय? उ० – लोक ज्याला मान देतात तो. प्र० - सावरकरानी हे पुस्तक तुम्हाला अर्पण केले काय? सायमन – प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय टिळकाना काय सांगता येईल? डार्लिंग- - पुस्तकावर दोघा सावरकरांची नावे आहेत. प्र० - ह्या दोघा बंधूंची माहिती तुम्हाला होती काय? उ०- -थोडीशी होती. प्र० - त्याना काळ्या पाण्याची शिक्षा झाली काय? उ० – झाली असे मला सुटून आल्यावर समजले. प्र० - मॅझिनीचे पुस्तक वाचून कान्हेरे याला खून करावासा वाटला काय? उ० – ते खरे को खोटे मी कसे सांगू? कार्सन – मी ह्या पुस्तकातील वाचून दाखवितो तो भाग ऐका.