पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भांग ४ टिळकांची उलट तपासणी प्र० - काळ पत्राचे परांजपे हे तुमचे शिष्य होते काय? उ० – माझ्या वेळी शाळेत एक विद्यार्थी होते. त्यांचा वर्ग मी शिकविला असेन. व्यक्तिशः त्याना शिकविले असे नाही. प्र० - परांजपे ह्याना शिक्षा झाली तेव्हां तुम्ही एकत्र राहात होता काय? उ० -एकाच खानावळीत होतो. प्र० – परांजपे यांच्यावर खटला झाला तेव्हां परांजपे जामीनावर खुले होते काय? उ० – नाही. प्र० – तुम्हाला पकडले त्यावेळी तुम्ही व ते एकत्र बसला होता काय? होय. उ० प्र० - त्यांच्या खटल्यात तुम्ही त्यांच्या बचावाला मदत करीत होता काय? उ०- - थोडीबहुत करीत होतो. प्र० - ते तुमचे स्नेही होते? उ०—पुष्कळ होते त्यातील ते एक होते. प्र० - त्यानाहि राजद्रोहाबद्दल शिक्षा झाली होती? उ० – माझ्यापूर्वी सुमारे १५ दिवस. प्र० - त्यांचे व तुमचे लेख एकाच स्वरूपाचे होते काय? उ० – दोन्ही लेखां- वर राजद्रोहाकरिता खटला झाला म्हणून त्याना वाटेल तर एका स्वरूपाचे म्हणा. प्र० - तुम्ही परांजपे ह्याना काय मदत केली? उ०- -पैसे व बॅरिस्टर पाहून देणे ह्यासंबंधाने केली. प्र० - परांजप्यांचे लेख बाँबच्या अत्याचारासंबंधाने असता तुम्ही त्याना मदत केली १ उ० – गुन्हा कशाचाहि असला तरी स्नेही व आत बचावाला मदत करतातच. प्र० – तुम्ही अशा माणसाशी संगत ठेविली काय? आणि माझ्या संगतीचा स्नेहाचा काय संबंध? उ० – -त्यांच्या लेखाचा अंतर पडले की नाही? प्र० – त्यांच्या लेखाबद्दल तुमचे काय मत? उ० – लेख कडक होते. पण अत्याचाराना उत्तेजन देणारे होते असे वाटले नाही. प्र०—त्याना शिक्षा झाल्यामुळे तुमच्या स्नेहात उ० – शिक्षेमुळे स्नेहात अंतर पडण्याचे काय कारण? प्र० – मग कडक म्हणजे काय? उ० – विचारसरणी जरा कड़क. डार्लिंग – परांजप्यांच्या वर्गात टिळक Science शिकवीत होते ते कसले हे विचारा!

कार्सन–कसले Soience? उ० – पदार्थविज्ञान ज्योतिष व यंत्रशास्त्र. टि० उ... २०