पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो० टिळकांचे चरित्र भाग ४ प्र० न्या. दावर यांच्या उद्गारापेक्षा कडक असे काही शब्द चिरोल साहे- बांच्या पुस्तकात तुम्ही काढून शकाल काय? उ०- होय. जॅक्सनच्या खुनाशी त्यानी जोडलेला माझा संबंध. प्र० – एखाद्याने अत्याचाराला उत्तेजनकारक भाषण केले तर त्याला अत्या- चाराबद्दल जबाबदार मानावे की नाही? उ० - होय. तशी भाषणे एखाद्याने केली असे खरे ठरले तर! प्र० - खून व खुनाची चिथावणी ह्यात फरक होतो काय? उ०- म्हणाल तर फरक आहे. प्र०—यांत अधिक वाईट कोणते? उ० – ते मी नक्की कसे सांगू? परि- स्थितीप्रमाणे ठरवावे. - तसेच प्र० – देशी राज्या खाली लोक असतात तरी ते अधिक सुखी असतात असे तुम्ही लिहिले काय? उ० – होय. ते स्वराज्याखाली असते तर अधिक सुखी असते. - प्र० – ब्रिटिश राज्यकर्त्यांना तुम्ही राक्षस म्हणता काय? उ० – नाही. प्र० – परकी म्हणता काय? उ० - होय. प्र० - इंग्रजाना चळवळीने हाकलून देता येईल आणि ब्राह्मणाच्या हातात सत्ता येईल असे तुमचे मत होते काय? उ० - नाही. प्र० –चाँब ही एक जादू आहे तो एक ताईत आहे असे तुम्ही लिहिले काय? उ०—शब्द बरोबर आहेत पण त्याचा अर्थ वेगळा केला पाहिजे? प्र०—स्वराज्य ह्याचा अर्थ स्वातंत्र्य असा कंरिता काय? उ० साम्राज्यांतर्गत स्वराज्य असा करावयाचा. प्र० – गोरे लोक काढून लावावयाचे काय? उ० – - नाही. प्र०—चिरोलच्या पुस्तकाचे भाषांतर मराठीत झाले होते काय? उ० होय. - त्याच्यावर तुम्ही फिर्याद केली नाही काय? उ० – नाही. प्र० – कान्हेरे ह्यांचा जबाच तुम्ही वाचला आहे काय? उ० –होय. प्र० प्र० - त्याने म्हटल्याप्रमाणे म्हणजे हिंदुस्थानात न्याय मिळत नव्हता असे आरोपी म्हणाला तसे तुम्ही लिहित होता काय? उ० – वरचेवर नाही. एखादे वेळी लिहिले असेल. युरोपिअन व नेटिव्ह असा विरोध आला म्हणजे न्याय मिळणे कठीण असते असे माझे मत आहे. प्र० मुसलमानाना पक्षपात होतो असे तुम्ही लिहिले काय? उ० -दंग्याच्या बाबतीत अधिकारी पक्षपाती असतात असे मी लिहिले आहे. प्र०—साहेबांच्या जुलुमाची उदाहरणे तुम्ही दर आठवड्यास देत होता काय? उ० दर आठवड्यास नाही. नजरेला येत तेव्हा देई.