पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ टिळकांची सरतपासणी प्र० तेथे काय घडले? कार्सन –– ह्या प्रश्नाला माझी हरकत आहे. सायमन – एखाद्या गुन्ह्याबद्दल एखाद्याला तुम्ही जबाबदार धरता तर तेथे त्यानी काय केले काय घडले हे न सांगितले तर कसे होईल? प्र० – टिळक तुम्ही तेथे अत्याचाराना उत्तेजन दिले काय? उ० – नाही. कार्सन– साक्षीदाराला प्रश्न धडकावून विचारला म्हणून त्यांनी तसे उत्तर दिले. सायमन – अत्याचाराना अनुकूल किंवा प्रतिकूल यापैकी काही तुम्ही वर्तन केले काय? उ० – अत्याचाराविरुद्ध उपदेश केला आणि केवळ सनदशीर मार्गाने व शिक्षण प्रसाराने आपले काम करण्यास सांगितले. प्र० प्र० – त्यानंतर पुन्हा केव्हा तरी नाशकास गेला काय? उ०—-नाही. -कान्हेरे यांचे तुम्ही नाव तरी ऐकले होते काय? उ०–नाही. प्र०—गुप्तमंडळ्यांची तुम्हाला काही माहिती होती काय? उ०- मी हिंदु- स्थानातच नव्हतो. प्र० -चिरोल साहेबानी तुम्हाला खुनाकरिता जबाबदार धरले आहे ते बरो- वर आहे काय? उ०—साफ चूक आहे. सर एडवर्ड कार्सन ह्यानी केलेली टिळकांची उलट तपासणी. प्र० - ही फिर्याद मांडण्याला सॉलिसिटरला तुम्ही कधी सांगितले? उ०- १९१५ सालच्या आक्टोबर महिन्यात. प्र० - तुम्ही हिंदुस्थानात फिर्याद का केली नाही? उ०–मला येथे फिर्याद करणे बरे वाटले म्हणून! प्र० – विलायतच्या लोकाना तुमची माहिती नाही व त्याचा फायदा घेण्या- करिता येथे फिर्याद केली असे नव्हे काय? उ० नाही. चिरोल साहेबांचे पुस्तक सगळ्या साम्राज्यात वाचतात. म्हणून इंग्लंडातील कोर्टाचा निकाल मिळाला असता तो साम्राज्यभर जाहीर होईल म्हणून. प्र०—तुम्हाला असे वाटे काय की युरोपात किंवा सर्व तुम्हाला ओळखतात? उ०—तसे मी म्हणत नाही. साम्राज्यात लोक प्र० - हिंदुस्थानात तुम्ही याबद्दल काही केले नाही? उ०- करावयाचे? तेथे खरा प्रकार सर्वांना माहितच आहे. काय बोलले हे बोलावेसे वाटले प्र०–न्यायमूर्ति दावर हे शिक्षा सांगताना तुमच्याबद्दल तुम्हाला माहित आहे काय? ३० – होय. न्यायमूर्तीना जसे तसे ते बोलले. (येथे कार्सनसाहेबानी न्या. दावर यांचे समग्र भाषण ज्यूरीला वाचून दाखविले.) प्र० – हे उद्गार हिंदुस्थानांतील लोकाना पुरे माहित होते म्हणून तुम्ही तेथे. फिर्याद केली नाही? उ०—असे नाही. - तेथे कशाकरिता