पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ लो० टिळकांचे चरित्र भाग ४ प्र० – केसरीत त्यासंबंधाने आलेले लेख तुम्ही लिहिले काय? आणि त्या वेळचे तुमचे मत हेच तुमचे मत आहे काय? उ० – होय. प्र० -रँडचा खून कोणी केला असावा ह्याविषयी तुम्हाला कल्पना होती काय? उ० – मुळीच नव्हती. १८९७ साली मला शिक्षा झाल्यानंतर पोलिसाना गुन्हे- गार सापडला. प्र० – या गुन्हेगारानीच तुमच्या देखत शिवाजी उत्सवातील श्लोक म्हटले काय? खुनापूर्वीच्या शिवाजी उत्सवात चाफेकरानी काही पद्ये म्हटली काय? उ० –नाही. प्र० - ह्या चाफेकराची तुम्हाला पूर्वी माहिती होती काय? उ० – नाही. प्र० – तुमच्यावरील खटल्यात तुमचा व खुनाचा संबंध जोडण्यासारखा काही पुरावा आणला होता काय? उ०- नाही. पुरावा देता येत नाही असेच अॅडव्होकेट जनरल यानी म्हटले व न्यायमूर्तीनीहि जूरीला सांगितले. प्र० -न्यायमूर्तीनी ज्यूरीला खटला समजावून देताना प्लेगसंबंधाने तुमच्या कामगिरीची प्रशंसा केली काय? उ०—होय. प्र० -आणि शिक्षा कमी देण्याला ते एक कारण म्हणून सांगितले काय? - होय. उ०. प्र० – आधी सुटलो तर चांगली वर्तणूक ठेवीन असे तुम्ही लिहून दिले होते काय आणि ते तुम्ही मोडले काय? उ०——–असे लिहून दिले नव्हते व ते मोडलेहि नाही. मला अटी घातल्या त्या वेगळ्या होत्या. सुटकेसंबंधाने मिरवणु- कीत भाग घेऊं नये इतकीच अट होती व ती मी पाळली. दुसरी अट पुन्हा राजद्रोहाचा गुन्हा केल्यास शिल्लक असलेली सहा महिन्यांची शिक्षा भोगण्याची होती. तीहि मी भोगली. म्हणजे तीही अट पाळली. डार्लिंग – सहा वर्षांच्या शिक्षेच्या मुदतीत तुम्हाला काही सूट मिळाली नव्हती काय? उ०-नाही. प्र०—तुम्हाला अटक केव्हा झाली? उ० प्र० – सुटका केव्हा झाली १ उ० जून १९१४ मध्ये. १९०८ मध्ये. प्र० - दरम्यान तुम्हाला बाहेरील काही हकीगत कळत होती काय? उ०—कशी कळणार? एकही वर्तमानपत्र मला ह्या मुदतीत मिळालेले नाही. प्र०—तुमच्या वर्तमानपत्रात तरी काय लिहावे याविषयी तुम्हाला सल्ला मस- लत देण्याला सवड होती काय? उ०–नाही. प्र०—नाशकास तुम्ही केव्हा गेला? उ० – १९०६ साली. प्र०—त्या साली तुम्हाला मित्रमेळ्याने पानसुपारीला बोलाविले होते काय? २ होय. ३०-