पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भांग ४ टिळकांची सरतपासणी प्र० - शिवाजी उत्सवातून तुम्हाला राजद्रोह उत्पन्न करावयाचा होता काय? उ० तसा मुळीच नव्हता. तेव्हा तसे कोणी म्हणालेहि नाही. प्र०—असे कोणी म्हणाला तर ते खोटे? उ० – निखालस खोटे. प्र० - शिवाजी हा ब्राह्मण होता काय? उ०-नाही. प्र०—तुम्ही स्वराज्याची मागणी केली काय? आणि पूर्ण स्वातंत्र मागितले काय? उ० साम्राज्यात असलेले स्वराज्य आम्ही मागत होतो. प्र० - युद्ध करून राज्य मिळवावे असे तुमचे मत आहे काय? उ० – नाही आम्ही फक्त अधिक हक मागत होतो. साम्राज्यातून फुट्न जावे असे म्हणत नव्हतो. म० - तुम्ही कधी गुप्त मंडळात होता काय? किंवा काढली काय? उ०—नव्हतो व कधी काढणारहि नव्हतो. प्र० - लेग प्रथम कोठे सुरू झाला? डार्लिंग-हे साद्यन्त विचारीत बसणार की काय? सायमन – प्लेगचा संबंध फक्त रँडसाहेबांच्या खूनापुरता आहे. डार्लिंग रँडचा खून का झाला येवढेच त्याना विचाराना? मात्र हा प्रश्न थोडा अवघड आहे खराच. सायमन–प्लेगच्या दिवसात टिळकानी लोकाकरिता काय काय केले हे कळले म्हणजे आपण सुचविलेल्या प्रभावरहि प्रकाश पडेल. म्हणूनच ती हकीगत विचारा- वयाची. डार्लिंग – पण त्यांच्या लेखावरून ते दिसत नव्हते काय? निदान लेखात नसेल तेवढेच तरी विचारा! -मुंबईनंतर एका महिन्याने. प्र० - पुण्यास प्लेग केव्हा सुरू झाला? उ०—१ प्र० मुंबईस कोणते उपाय योजिले? कार्सन – ह्या प्रश्नाना मी हरकत घेतो. डार्लिंग–प्लेग आला तेव्हा तुम्ही स्वतः मुंबईत होता काय? - उ० नव्हतो. डार्लिंग – मग मुंबईतील हकीगत ते काय सांगणार? कार्सन- मुंबईची गोष्ट वेगळी व पुण्याची गोष्ट वेगळी होती. डार्लिंग-वादाचा मुद्दा असा आहे की ते उपाय पुण्यास अमलात आणले असते तर त्रास झाला नसता. (त्यानंतर पुण्यातील म्युनिसिपालिटी सेग्रिगेशन कँप प्लेग इस्पितळ सेग्रिगेशन कँपातील अडचणी तेथे लोकाना मदत देण्याची झालेली खाजगी व्यवस्था सोजीर लोकांची तपासणी त्याचबरोबर तपासणीला जाण्याचे टिळकानी सोडून दिले ह्याची कारणे ह्या बाबतीत रँडसाहेबाकडे केलेला अर्ज त्याचे परीक्षण वगैरे गोष्टीविषयी प्रश्नोत्तरे झाली). प्र० - रँडसाहेबांच्या खुनाची बातमी तुम्हाला केव्हा कळली? उ० - दुसरे दिवशी सकाळी.