पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ राष्ट्रीय सभेचा वाद १३ ८० साली अफगाणिस्थानाशी युद्ध सुरू असताना आलेल्या संकटासंबंधी पुण्याच्या शहरवासी लोकाची जी जाहीर सभा भरविण्यात आली होती तिची हकीकत त्याने पहावी. यावरून सरकाराविषयी आमची राजनिष्ठा व त्यास मदत करण्या- विषयीची आमची बुद्धि ही नैसर्गिक व अढळ आहेत आणि अशा प्रसंगी आमची कर्तव्ये व जबाबदारी आम्ही राजनिष्ठपणाने ओळखीत असतो असेच सिद्ध होते. " टिळकांचा हा जाहीरनामा निघताच सरकाराने २५ जूनचा आपला जाहीर- नामा परत घेतला. लगेच मुंबई सरकाराने या दोन्ही गोष्टी स्टेट सेक्रेटरीकडे कळ- विल्या आणि लॉर्ड क्र्यू यानी केरहार्डी याना लिहून कळविलें कीं, 'टिळकानी सरकाराविषयी स्नेहभावाचे उद्गार काढल्यामुळे आम्ही त्याजवरचा पहारा वगैरे आता उठविला आहे. (४) राष्ट्रीय सभेचा वाद पण हे जाहीरपत्र प्रसिद्ध होण्यापूर्वीच इतर रीतीने टिळकानी जाहीरपणे सभांतून वगैरे भाग घेण्यास प्रारंभ केला होता. व सरकारनेहि टिळकाशिवाय इतर लोकाशी सामोपचाराचे बोलणे सहानुभूती मिळविण्याकरिता सुरू केले होते. ता. १८ ऑगष्टच्यापूर्वीच पुणे सार्वजनिक सभेने युद्धाच्या कामी ब्रिटिश साम्राज्यास राजनिष्ठापूर्वक सहाय्य करण्यास आम्ही तयार आहोत अशी तार सरकाराकडे केली. ता. १९ रोजी पुणे जिल्ह्याचे कलेक्टर. मि. माँटफर्ड यानी युद्धविषयक कोणत्या बातम्या छापाव्या कोणत्या छापू नयेत म्हणजे सरकारास मदत होईल अशाविषयी खुल्या मनाने पुढाऱ्यांशी वाटाघाट केली. ता. २५ ऑगष्टच्या केस- रीत गणेश उत्सवामध्ये टिळकांचे गीतेवर प्रवचन झाले ता. २६ रोजी करंदीकर यांच्या व्याख्यान्याचे दिवशी आणि ता. २८ रोजी शिवरामपंत परांजपे यांच्या व्याख्यानाचे दिवशी टिळकानी अध्यक्षस्थान स्वीकारून व्याख्याने दिली. सप्टेंबर ता. १९ पासून चार दिवस गीतेवर टिळकांची प्रवचने झाली. व अशा रीतीने सुटकेपासून सुमारे दोन महिन्यांचे आंत टिळक सार्वजनिक कार्यात प्रविष्ट झाले. या पुढे काही दिवस युद्धाशिवाय वर्तमानपत्राना दुसरा विषय नव्हता. केसरीत प्रथम युद्धानु- रोधाने जुन्या ऐतिहासिक प्रसंगावर व नंतर हिंदुस्थान व लष्करी शिक्षण या विषयावर लेखमाला सुरू झाली. कारण युद्धाचा फायदा घेणें आणि लष्करी शिक्षण इकडे चालू करणे इष्ट आहे या गोष्टी सरकारच्या मनावर बिंबविण्याला हा सहजन्च योग्य प्रसंग होता. या सुमारास सर व्हॅलेन्टाईन चिरोल हे विलायतेतील लोकांना असे सांगू लागले की ज्याअर्थी जुन्या इंग्रजी राज्यपद्धतीचे गुण गाऊन टिळकासारखे लोकहि राजनिष्ठा प्रगट करू लागले आहेत त्याअर्थी आहे ही राज्यपद्धति पुढेहि चालण्यास हरकत नाही तीत फारशी सुधारणा करावयास नको. पण ज्या पत्रांत टिळकांनी इंग्रजी राज्याचे गुण घेतले त्याच पत्त्रांत टिळकांनी आम्ही आयरीश लोकाप्रमाणे हिंदुस्थानाला स्वराज्य मागणारे आहो व त्याची खटपट