पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ लो० टिळकांचे चरित्र भाग ४ स्पेन्स – पण चंदावरकरांच्या निकालाचे प्रिव्ही कौन्सिलात काय झाले हे सांगा- वयाला नको काय? डार्लिंग-पण तो आम्हाला माहित आहे. तुम्ही तो खटला प्रिव्हीकौन्सि- लात जिंकला. पण चिरोल साहेबानी लेख लिहिला तेव्हा प्रिव्हीकौन्सिलचा निकाल झाला नव्हता हे खरे ना? स्पेन्स – पण टिळकांच्या ज्या चारित्र्याविषयी चिरोल साहेबानी लिहिले त्या चारित्र्याशी प्रिव्हीकौन्सिलचा संबंध येतो म्हणून. प्र० - गणपतिउत्सव हा काय आहे? उ०—- धार्मिक व सामाजिक उत्सव आहे.

ह्या संबंधाने पुढे झालेल्या प्रश्नोत्तरात टिळक म्हणाले "नातूंची मदत घेऊन मी हा उत्सव सार्वजनिक केला हे खरे नाही. तो ७ व्या शतकाइतका जुना आहे. ३०-४० वर्षे अलीकडे तो मागे पडला म्हणूनच तो पुढे आणला. तीही गोष्ट प्रथम लोकानीच केली. त्यात त्यानी एक मंडळ नेमले. त्यात मला एक सभासद नेमले. मी मिरवणुकीत जात असे. मेळ्याची पदे ऐकली आहेत. गणपति बरोबर शिवाजीचीहि पदे म्हणतात. इतर ठिकाणाप्रमाणे माझ्याहि घरी उत्सव होई. पदे अनेक विषयावर असत. पदे तपासून पसंत-नापसंत हे कोणी ठरवीत नव्हते. वाटेल तेथे वाटेल ती पदे म्हटली जात. मुलाना पट्ट्याचे हात वगैरे शिक- विण्याचे बाबतीत मी विशेष पुढाकार घेतला नव्हता. मुलाना कवाईत शिकवून सरकारला देशातून घालवून द्यावे असा माझा हेतू होता हा आरोप चिरोल साहेबानी मजवर केला तो अगदी खोटा आहे. ही गोष्ट त्यांनी केवळ आपल्या कल्पनेतून काढली आहे. देशी उद्योगधंदे निकृष्ट स्थितीत आले आहेत म्हणूनच स्वदेशीची चळवळ सुरू झालेली होती. (यानंतर शिवाजीउत्सव शिवाजी व अफझुलखान यांच्या संबंधाने काही प्रश्नोत्तरे झाली.) प्र० - शिवाजी व अफझुलखान यांच्या वादात तुमचे म्हणणे तेच हिंदुपक्षाचे म्हणणे होते? उ – होय. प्र—मग चिरोल साहेबांचे पुस्तक वाचून तुमचे मत चूक होते असे तुम्हाला वाटत नाही काय? उ० – मुळीच नाही. चिरोल साहेबांच्याहि वरचे ह्या विषया- तले अधिकारी इतिहासज्ञ किंकेड साहेब हे त्यापैकी एक होते. त्यांचे पुस्तक यंदा प्रसिद्ध झाले आहे. शिवाजीने अफझुलखानाचा विश्वासघाताने खून केला हे ते मुळीच म्हणत नाहीत. डार्लिंग – विश्वासघात ह्या शब्दात एवढे काय पाप आहे? उ० - शिवाजीला तो शब्द लावण्यात पाप आहे. डार्लिंग—पण हे प्रकरण फार जुने. आता ते उकरून का काढावे? उ० – ज्यांचा आपण उत्सव करितो त्यांचेवरील आक्षेपाचे निरसनहि आम्हाला करावे लागते.