पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ टिळकांची सरतपासणी ३१ प्र० – प्रायःश्चित्ताची किंमत किती होती? उ० – आठ आणे किंवा चार आणे. डार्लिंग—चहाची किंमत बहुधा तितकीच असेल. प्र० स्वतः तुम्ही आखाडा घातला आहे काय? उ०- मी स्वतः घातला नाही किंवा कोणत्याही आखाड्यात सभासद किंवा वर्गणीदार नव्हतो. प्र० - यावेळी तुम्ही काही वर्गण्या गोळा करीत होता काय? उ० त्या शिवाजी स्मारकाकरिता होत्या. आमच्या राजकीय मतप्रसाराकरिता नव्हत्या. प्र० – पैसाफंड हा कशाकरिता? उ०-उद्योगधंद्याच्या बाढीकरिता. त्या फंडाची सभा रजिस्टर झालेली होती. तिला राजकीय स्वरूप काहीच नव्हते. प्र० – आणखी काही वर्गण्या जमविता? उ० - होय. १९०६ पासून राष्ट्रीय शिक्षणाकरिता वर्गण्या जमवितो. प्र० त्या वर्गण्या बळजबरीने जमविता काय? उ० – हे अगदी खोटे. धमकी दपटशहा वगैरे काहीच नाही. लोक प्रेमाने देतात व त्या घेतल्या जातात. प्र० – तुमच्या पत्रात ज्यांच्यावर टीका होती त्यांच्याकडे तुम्ही कधी वर्गण्या मागता काय? उ० मुळीच नाही व ते देतहि नाहीत. टीकेचा व वर्गण्यांचा काही संबंध नसतो. टीका सामाजिक किंवा राष्ट्रीय असते. (ह्यानंतर ताई महा- राज प्रकरणासंबंधाने स्पेन्स ह्यानी टिळकांकडून प्रश्नोत्तराने माहिती काढून घेतली. त्यात दत्तविधान दिवाणी फौजदारी खटले त्यावरची अपिले शिक्षा व दोषमुक्तता वगैरे हकिगती होत्या.) प्र० – या प्रकरणात तुम्ही ट्रस्टी म्हणून काम करीत होता? उ० - होय. माझा व्यक्तिश: पैशाचा काही संबंध नव्हता. डार्लिंग - त्याचा ह्या बेअब्रूच्या खटल्यात काय संबंध? स्पेन्स – टिळकांच्या अंगी सामान्य माणसाचाहि प्रामाणिकपणा नव्हता असे प्रतिवादीने लिहिले हाच. कार्सन–पण ती टीका न्यायमूर्ति चंदावरकर यांच्या निकालाला अनुसरून होती. डार्लिंग—–सर्व लोक जाहीरपणे जी गोष्ट बोलत आहेत ती चिरोल साहेबानी लिहिली. प्रत्यक्ष पैशाची चोरी न केली म्हणजे झाले नाही. खऱ्या प्रामाणिकपणाला त्याहून अधिक गोष्टी लागतात. अप्रामाणिकपणाचा केवळ पैशाशी संबंध नसतो. -अप्रामाणिकपणाबद्दल तुमच्यावर केव्हा खटला झाला काय? उ०- नाही. (येथे प्रिव्ही कौन्सिलचा निकाल दाखल करण्यात आला.) प्र० डार्लिंग – चिरोल साहेबांचा लेख चंदावरकरांच्या निकालासंबंधी आहे. प्रिव्ही कौन्सिलसंबंधी नाही.