पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो० टिळकांचे चरित्र भाग ४ प्र० गोरक्षणाचा हेतू मुसलमानाना चिथावण्याचा असतो काय? उ०- नसतो आणि तसा परिणाम झाला नाही. - प्र० –गोरक्षणाच्या चळवळीत तुम्ही पुढे जाउ नका असे उदारमतवादी लोक तुम्हाला म्हणत काय? उ० – कधीच नाही. चिरोल साहेबांच्या त्या वाक्याचा अर्थच मला कळला नाही. स्वतः मीहि उदारमतवादीच (Liberal Hindu) आहे. पुण्यास सभा झाली तिचा गोरक्षणाशी संबंध नव्हता तर हिंदु- मुसलमानांच्या दंग्याशी होता. प्र० तम्हाला काय करू नका असे ते म्हणत? उ०- त्यांचे म्हणणे असे की दंगे झाले आहेत होत आहेत तरी त्यांची चर्चा सपाटून करू नका. डार्लिंग – लोक नको म्हणत असता तुम्ही सभा भरविल्या? सायमन–होय. पण सभा गोरक्षणासंबंधी नव्हत्या. प्र० - सभेत काय ठरले? उ० – सलोख्याची पंचायत नेमावी. त्यानी चालिरीती काय आहेत त्या पाहाव्या व अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे योग्य सल्ला- मसलत द्यावी. (येथे या सभेची केसरीतील हकिगत दाखल करण्यात आली). प्र० – पुण्यास किती मुसलमान आहेत? उ० – शेकडा १० मुसलमान व ९० हिंदू. कार्सन स्पेन्स – बाळासाहेब नातु. सभेचे अध्यक्ष कोण होते? प्र०—सभेला किती लोक होते? उ०-पाच पासून सहा हजार. डार्लिंग – मग ही सभा बहुधा मैदानातच असेल. उ०- पहि होता. (ह्यानंतर सभेतील ठराव वाचून दाखल करण्यात आले.) प्र० स्वतः तुम्ही भाषण केले त्यात काय म्हणाला? उ०—-हिंदुमुसल मानानी स्नेहभावाने राहावे असे म्हटले आणि तसाच शक्य तितका प्रयत्न करीत होतो. मैदानावर मंड- प्र० - नातु हे कोण होते? उ०-दोघेहि ब्राह्मण इनामदार व सरदार. प्र० त्यांचा तुमचा वाद कशाबद्दल झाला? उ०- मजवर ग्रामण्य घातल्या- बद्दल वाद दोन वर्षे चालू होता. आणि त्यामुळे काही बेबनाव झाला होता. प्र० – ग्रामण्याचा निकाल काय झाला? उ० – धार्मिक न्यायकोर्टाने आम्हा- वर प्रायः श्चित्त लादले. प्र०—ह्या धर्माच्या न्यायकोर्टात कोण होते? उ० – दोन शास्त्री. इटाली- तील पोप जसे धर्माधिकारी नेमतो तसे. डार्लिंग - - वा! मग ही धर्माची न्यायसभा मोठी छान असली पाहिजे! प्र० – मग तुम्हाला बहिष्कृत केल्यापासून त्रास झाला असेल? उ० - नाही. शास्त्री लोकाना बहिष्काराचे अधिकार नाहीत अशी तक्रार मी केली.