पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ टिळकांची सरतपासणी २९ ल्याच्या वेळी म्हणजे १९०८-९ साली खून वगैरे झाले त्यावेळी केसरीचा खप १५ पासून २० हजारापर्यंत व मराठ्याचा खप १००० पासून १५०० पर्यंत होता. प्र० – केसरीतील म्हणून या ठिकाणी काही लेख आले आहेत. पण त्यातील काही इतरानीच लिहिलेले आहेत ना? उ० – होय. त्यातील काही लोक बाहेर गावाहून पत्रव्यवहार करणारे आहेत. प्र०. ० - राष्ट्रीय सभेशी तुमचा संबंध होता काय? उ० – मी प्रायः दर वर्षीच राष्ट्रीय सभेला जात असे. प० - तुम्ही म्युनिसिपालिटी व कायदे कौंसिल यांचे सभासद होता काय? उ० – होय. प्र० – १८९७ सालामध्ये दंग्याबद्दल तुम्ही केसरीत काय मत प्रतिपादिले? कार्सन – हे पुराव्यात कसे कोठे येईल? सायमन त्यासंबंधाने कागदपत्र पुराव्यात आहेतच पण तोंडाने थोडक्यात उत्तर मिळते म्हणून. कार्सन – टिळकांच्या मतांचा पुरावा लेखात आहे आणि ते लेख येथे आहेत. मग टिळकांच्या तोंडी मताचा काय उपयोग? लोकाशी संबंध आला तो त्यांच्या लेखी मताचा. म्हणून त्या लेखांचा काय परिणाम झाला असेल हे आप- णास पाहावयाचे. डार्लिंग – मला वाटते कार्सनसाहेबांची हरकत बरोबर आहे. कार्सन–पण मी हरकत वाटेल तर घेत नाही. त्यानी वाटेल ते विचारावे मी त्याबद्दल उलट तपासणी करीन. प्र० - दंग्यासंबंधाने तुम्ही लेखात काय मत दिले? उ०-गोरक्षणाच्या चळवळीमुळे दंगे झाले हे सरकारचे मत मी खोडून काढले. आणि वाद्याच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी जे नियम केले त्यामुळे दंगे झाले असे माझे मत मी दिले होते. प्र० -स्वतः तुम्ही एखादी गोरक्षण मंडळी काढली होती काय? उ० – नाही. प्र०—यापूर्वी अशा मंडळ्या निघाल्या होत्या काय? उ०- ह्यापूर्वी ५० वर्षापासून. प्र०—तुम्ही अशा मंडळीचे सभासद होता काय? उ०-नाही. मी फक्त त्याना साहाय्य करितो. मी त्याना कधी नियमित वर्गणी दिलेली नाही. १८९७ साली मुख्य दोन मंडळ्या होत्या. आणि त्यांच्या काही शाखा होत्या. शाखा निरनि राळ्या प्रांतात होत्या. प्र० – गोरक्षण मंडळाचा उद्देश काय? डार्लिंग – हे काय विचारता? गाईचे रक्षण करण्याचा. प्र० – तुमच्यात गाईचे महत्त्व मानतात काय? उ० – धर्माच्या संसाराच्या व शेतीच्या दृष्टीने मानतो. हिंदु प्रायः शाकाहारी असतात. मुसलमान नसतात.