पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ लो० टिळकांचे चरित्र भाग ४ सायमन - होय. चिरोल साहेबानी तसेहि म्हटले होते खरे. पण हिंदुस्थानात आरोपीच्या जत्रावाची तन्हा काही वेगळीच आहे. प्रश्न एक दोनच असावयाचे व त्याच्या उत्तरादाखल लांबलचक कित्येक परस्परविरोधी विधाने करण्यात येतात. अशा गोष्टीना परवानगी मिळते व त्या करविल्या जातात हेच आश्चर्य होय. कान्हेरे याने तीन पत्रांची नावे घेतली. पण राष्ट्रमत निघाले त्यावेळी दुसऱ्या राजद्रोहाच्या खटल्याकरिता टिळकांना अटकच करण्यात आली होती. स्वतः टिळकानी राष्ट्रमताचा एक अंकहि कधी पाहिला नाही. हे पत्र ज्या कंप नीच्या मालकीचे तिची मूळ स्थापना करण्यापुरताच टिळकांचा संबंध होता. तसेच काळ पत्र हे टिळकांचे म्हणणे हा नुसता मूर्खपणाच आहे. काळपत्राची मते केसरीच्या पुढे जाणारी होती असे चिरोल साहेबानीच म्हटले आहे. त्याचा टिळकाशी काहीच संबंध नव्हता. स्वतः टिळकांच्या केसरी पत्तातहि सगळा मज- कूर ते लिहित नाहीत. पण ते त्याचे पत्र म्हणून सर्व जबाबदारी त्यानाच घ्यावी लागते. आणि १९०८ ते १९१४ पर्यंत तर स्वतःच्या केसरीशीहि टिळकांचा काही संबंध नव्हता. जॅक्सनचा खून केला तो मूर्ख कोवळ्या अशा अगदी थोड्या मोजक्या लोकानी! तेव्हा आता ज्यूरीने असा विचार करावा की जॅक्सनचा खून व टिळक यांचा जो संबंध चिरोल साहेबानी जोडून दिला आहे तो कित- पत योग्य आहे? उलट पाहिले तर असाहि पुरावा आहे की १९०६ साली टिळक नाशकास गेले तेव्हा त्यानी बेकायदेशीर प्रवृत्तीच्या तरुण लोकाना शहाण- पणाचा उपदेश केला आणि सनदशीर मार्गच स्वीकारा असे सांगितले. टिळ- कांचा नाशकाशी संबंध होता तो हा असा होता. ज्वलजहाल लोकाना असा उप- देश करण्याला ते कधी भ्याले नाहीत. रँडच्या खुनानंतर लोकाना काळीमा आग- णारी ही गोष्ट होय असेच टिळकानी लिहिले होते. असो. ह्या सहा मुद्यासंबंधाने आपणाला विचार करावयाचा आहे. आता मी टिळकांना साक्षीच्या पिंजऱ्यात बोलावतो. सर एडवर्ड कार्सन हे त्याची उलट तपासणी करणार तेव्हा टिळकांना ते एक मोठे दीव्यच करावयाचे आहे.. कार्सन–पण आपली उलट तपासणीहि काही कमी कड़क नसते. सायमन - - छे छे! चिरोलसाहेब साक्षीला येतील तेव्हा त्यांचा अनुभव वेगळा होईल. (५) टिळकांची सरतपासणी यानंतर टिळकांची सर तपासणी बॅ. स्पेन्स ह्यानी घेतली. त्यातील पहिला बराच भाग मामुली स्वरूपाचा होता. जबानीमध्ये शिक्षण विद्याभ्यास न्यू इंग्लिश स्कूल फर्ग्युसन कॉलेज केसरी व मराठा पत्रे त्यांची मालकी यासंबंधा- नेच ते प्रश्न होते. त्यातील मुद्याचा भाग इतकाच होता की टिळकावरील खट-