पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो० टिळकांचे चरित्र दिवस दुसरा (३० जानेवारी १९१९) या दिवशी सर जॉन सायमन यानी आपले भाषण पुढे सुरू केले. बेअब्रूच्या फिर्यादीतील बहुतेक मुख्य मुद्यांचे विवरण मी आतापर्यंत केलेच आहे. आता शिवाजीचे उद्गार हा जो दुसरा लेख केसरीत छापला गेल्याबद्दलहि शिक्षा झाली तो मी बाचून दाखवितो. डालिंग–मूळ लेखाचे भाषांतरात काही विकृत स्वरूप झाले असेल. मुळीच नाही असे नाही. पण शिवाजीच्या उद्गारात काही शब्द वापरले आहेत आणि त्यापैकी एकाचा अर्थ 'राज्यातील करवसुली' असा होत नाही काय? सायमन – अशा गोष्टी चुकूनहि होतात. स्वतः मीच एकदा पार्लमेंटमध्ये एका कराविषयी बोलत असता असे म्हटले होते की कर देणाऱ्या रयतेचा पैसा fiso मध्ये येतो. माझा अर्थ fise म्हणजे तिजोरी असा होता. पण दुसरे दिवशी पाहातो तो सरकारी रिपोर्टराने माझ्या भाषणाचा रिपोर्ट दिला त्यात fise ह्याच्या ऐवजी figt असा शब्द घातला आहे. पण तेवढ्याने किती तरी फरक झाला होता. २६ भाग ४ डार्लिंग–पण पार्लमेंटचे लोक हे अशा किरकोळ चुकानी भलता समज करून घेणार नाहीत. (या ठिकाणी रायगड येथील छत्रीच्या वर्गणीसंबंधाचा लेख वाचून दाखविण्यात आला.) सायमन–असल्या साध्या निरुपद्रवी लेखाकरिता टिळकाना राजद्रोही ठरविण्यात आले. कदाचित मुंबईच्या ज्यूरीने दिलेला अभिप्राय बरोबर होता असेच आपण म्हणू. पण रँडसाहेबांच्या खुनाला उत्तेजन देणारा तो लेख होता असे म्हणणे गैर आहे. ती केवळ ऐतिहासिक चर्चा होती. शिवाय ते किंवा हे लेख मधून मधून पत्रातून एकसारखे येत होते. वाद चालू होता. तथापि टिळक लोकाना सांगत होते की आरोग्यसंवर्धन व प्लेगप्रतिबंधक असे जे उपाय आधुनिक शास्त्रानी ठरविले आहेत ते आपण अमलात आणले पाहिजेत. तात्पर्य ऐतिहासिक चर्चा काहीहि चालली असली तरी व्यवहारात टिळक काय उपदेश करीत होते हे आपणाला पाहिले पाहिजे. (ह्यानंतर रँड व आयर्स्ट ह्यांच्या खुनाची हकीगत दिलेले लेख बाचून दाखविण्यात आले. तसेच टाइम्स ऑफ इंडिया पत्राने काय टीका केली त्याला केसरी व इतर पत्रानी काय उत्तरे दिली वगैरेचे लेखहि वाचून दाखविण्यात आले.) हे सर्व वाचले तरी टिळकाना दोष देण्यासारखे लिहिलेले त्यात काहीच नाही. गुन्हेगार सापडावा त्याची चौकशी व्हावी त्याला शिक्षा व्हावी हे सर्व टिळक म्हणतच होते. तथापि त्याचबरोबर पुण्यातील ब्राह्मणांचा कट आहे असे अनुमान कोणी काढणे बरोबर नाही हेहि ते सांगत होते. सायमन- डार्लिंग – हे प्रकरण पुरे करण्याकरिता मी इतकेच विचारतो की शेवटी कोणी गुन्हेगार सापडला की नाही?