पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ विलायतेतील सुनावणी ह्यानंतर गणपति व शिवाजी उत्सवासंबंधाने काही लेख वाचण्यात आले. सायमन—आपल्याकडेहि अजून पहिल्या चार्लस राजाचा शिरच्छेद झाला त्यासंबंधाने लोक चार्लसला माळा घालतात निशाणे मिरवितात. २५ डार्लिंग – पण ज्याला इकडे माळा घालतात त्याचा शिरच्छेद झाला होता. आणि हिंदुस्थानात व महाराष्ट्रात ज्याचा उत्सव करीत होते त्याने आपल्या प्रतिपक्षाचा शिरच्छेद केला हे खरे नव्हे काय? सायमन - होय. पण कॉम्वेलचाहि असाच उत्सव करितात. तेव्हा वाटेल तर तीहि उपमा व्यावी. उत्सव करणे ह्या गोष्टीचे सादृश्य कायमच राहाते. ह्या उत्स- वात निरनिराळी भाषणे झाल्याचा रिपोर्ट छापिला आहे. पण ती पाहिली असता एखादा इतिहासाचा प्रोफेसर ऐतिहासिक चर्चा करीत असावा इतकेच वाटते. त्यात राजद्रोहाचा काहीहि संबंध दिसत नाही. डार्लिंग–पण त्या चर्चेचे तात्पर्य भानूनी काय सांगितले आहे? शिवा- जीच्या वेळच्या हकिगती सांगितल्या पण त्या आजच्या काळाला लागू केल्या असे होत नाही काय? सायमन—पण प्रत्यक्ष टिळक काय बोलले हे आपण पाहिले पाहिजे. उत्सवाचा समारोप करिताना टिळक म्हणाले की " आपण शिवाजीविरुद्ध अफ- झुलखान ह्या वादात कोणतीहि व्यावहारिक स्वरूपाची चर्चा करीत नाही. जुन्या काळच्या मोठ्या लोकांच्या कृतीची चर्चा तात्विक ऐतिहासिक व नीतिदृष्ट्या आपण करीत आहो. मोठ्या माणसांचे उदाहरण लहानाना घेता येत नाही. ऋषीचे कूळ कोणी पाहू नये.

35 डार्लिंग—ही सगळी चर्चा जुन्या काळाच्यासंबंधानेच होती काय? सायमन – १८९७ च्या खटल्यात टिळकानी ही गोष्ट सांगताना 'अहो तो सगळा भूतकाळ होता' असे व्याकरणदृष्ट्या प्रतिपादिले होते. रँडच्या खुना- नंतर टिळकानी लेख लिहिले. त्यात त्या कृत्याविषयी अतिशय कळकळीने निषेध प्रदर्शित केलेला आहे. तथापि अखेर टिळकांवर खटला करण्यात आलाच. डार्लिंग–मला असे वाटते की ऐतिहासिक चर्चेकरिता टिळकांवर खटला झाला नव्हता. तर मुसलमानांच्या जागी इंग्रज आले आणि मुसलमानाना पूर्वी जसे वागविले तसे इंग्रजाना वागवावे असे सांगण्याचा टिळकांचा उद्देश सरकारला वाटला म्हणून खटला केला. आणि न्यायाधीशालाहि तसे वाटले म्हणून त्याना शिक्षा दिली. सायमन—होय. तसेहि असेल. पण प्रत्यक्ष बोलल्याबद्दल टिळकाना शिक्षा झाली नसून काही विशेष प्रकारचा मजकूर छापल्याबद्दल शिक्षा झाली हेहि लक्षात घेतले पाहिजे.