पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ लो० टिळकांचे चरित्र भाग ४ १२ वर्षे पर्यंत तिला पैशाची तंगी सोसावी लागेल. हेच ह्या लेखाचे तात्पर्य आहे. सायमन—होय. अगदी बरोबर. रँडसाहेबांसंबंधाने पत्रातून तक्रारी केल्या गेल्या आहेत ही गोष्ट खरी आहे. डार्लिंग – पण एका वाक्यात असेहि आहे की सोजीर काही चूक करतील असे रँड साहेबाना मुळीच वाटत नाही. सायमन—होय तीहि गोष्ट खरी आहे. सेग्रीगेशन कँपात पुष्कळ लोक नेऊन घातले पाहिजेत. ह्या गोष्टीला अनुलक्षून एकाने लिहिले आहे की पूर्वी राक्षसाला जसे ठराविक बळी द्यावेच लागत तशीच गोष्ट घडते. ह्या उपमेचा अर्थ सहजच लक्षात येईल. रँडसाहेबापेक्षा अधिक सहानुभूतीचे अधिकारी नेमण्यात आले असते तर व्यवस्था कमी दुःखद झाली असती असे म्हटले आहे. डार्लिंग–असल्या लेखाना राजद्रोहात्मक म्हटले जात होते काय?. सायमन–होय. टिळकावरील राजद्रोहाच्या खटल्यात असले काही लेखहि पुढे आणण्यात आले होते. कार्सन–पण ह्याच्याहि पुढचा लेख वाचाना! त्यात काय म्हटले आहे? सायमन—होय. त्यात एक पौराणिक दाखला दिला आहे. पृथ्वी दुःख- ग्रस्त झाली म्हणजे ती ईश्वराला शरण जाते. तसे पुणे हे लॉर्ड सँडहर्स्ट ह्याना शरण गेले. पण कित्येक वेळा ईश्वर झोपी जातो तसेच लॉर्ड सँडहर्स्ट हे झोपी गेले आहेत असे म्हटले आहे. डार्लिंग रँडचा खून कधी झाला? सायमन – २२ जून रोजी. डार्लिंग—आणि आता हे वाचलेले लेख कधी प्रसिद्ध झाले? सायमन – २७ एप्रिल रोजी. डार्लिंग – ह्या लेखात असे म्हटले नव्हते काय की रँडशाही अशीच फार दिवस चालायची असेल तर लोक कितीही गरीब असले तरी ते हा उपद्रव एक- सारखा सोसणार नाहीत? आणि हे लिहिल्यावर दोन महिन्यानी रँडसाहेबांचा खून झाला? सायमन—गोष्ट खरी पण म्हणून टिळक हे खुनाला जबाबदार आहेत असले विधान प्रतिवादीने कराबे की काय हेच मी ज्यूरीला विचारणार आहे. (ह्या ठिकाणी १८९७ सालच्या खटल्यात उलट सुलट दाखल झालेल्या काही लेखांची चर्चा झाली.) एका वाक्यात असे म्हटले आहे की रात्री सोजीरानी लोकावर छापा घातला तरी भ्यालेल्या लोकाना अधिक भीति कशी वाटेल हे रँड साहेबाना समजत नव्हते. पण मी म्हणतो कधी होणारी नाही अशीच गोष्ट घडली. डॉ. ब्लॅनी सारख्यानी टाइम्स ऑफ इंडिया पत्रात काय लिहिले आहे तेहि पाहण्यासारखे आहे. हे डॉक्टर होते व इंग्रज होते. त्यांच्या लिहिण्यावरून प्लेगची व्यवस्था किती वादग्रस्त आहे हे कळून येईल.