पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ विलायतेतील सुनावणी २३ डार्लिंग—ते असो. सायमन साहेबांचे म्हणणे इतकेच की टिळक लिहित होते ते जपून सावधगिरीने लिहित होते. सायमन - होय तोच माझा मुद्दा आहे. पण अशाच वेळी लोकाना उपदेश करिताना त्याबरोबर प्लेग व्यवस्थेत काय अव्यवस्था आहे हे दाखविणे टिळकाना जरूर होते. गोरे सोजीर लोक तपासणीवर घातले ह्याचे तुम्हा आम्हाला काही वाटत नसेल. पण त्यांच्याऐवजी हिंदी शिपाई त्वा कामाला लावले असते तर अधिक बरे झाले असते. लोकांची सहकारिता प्लेगच्या व्यवस्थेत संपादावयाची तर त्यांच्या विश्वासाची माणसे कामावर लावली पाहिजेत. सोजीर लोकांच्या हातून किती तरी चुका घडल्या आणि ह्याविषयी उघड तक्रार करणे हेहि काही गैर- वाजवी म्हणता येणार नाही. लोकांचे दुःख काय होते हे अधिकान्यांना कळत नव्हते. म्हणूनच त्यांना साहेबापर्यंत जाऊन शिष्टमंडळाच्या द्वारे तक्रारी सांगाव्या लागल्या. ह्या शिष्टमंडळात प्रतिष्ठित लोक होते. त्यानी रँड साहेबाना अनेक सूचना केल्या. खाजगी स्वयंसेवक नेमून त्यांच्याकडून तपासणी करावी असे सुत्र- विले. लोकांच्या मालमत्तेचे रक्षण करण्याचा मार्ग त्यानी सुचविला. ही सर्व विधा- यक कामगिरी होती. यात चळवळ नव्हती. राजकारण नव्हते. तर फक्त लोक- हिताची दृष्टि होती. (येथे सार्वजनिक सभेचा अर्ज करण्याचा हक्क सरकारने पुढे काढून घेतला या संबंधाची बरीच चर्चा झाली. पण वास्तविक तो ह्या खटल्या- तील मुद्दा नव्हता.) एका लेखात हल्लीच्या व्यवस्थेपेक्षा मोंगलाई बरी असे लिहिले आहे हे अतिशयोक्तीच्या झोकांचे तर खरेच पण त्यालाहि कारण होते. डार्लिंग—हिंदुस्थानात मोंगलाई राज्य कोणी सुरू केले? सायमन – बाबर बादशाहाने केले असे म्हणतात. डार्लिंग – ते राज्य फार जुलमी होते नाही? सायमन – होय ह्यात शंका नाही. कार्सन– मोंगलाई हा शब्द नेहमी जुलमी व अनियंत्रित राज्याला लावतात. डार्लिंग—इंग्रजी राज्याची कशाशी तुलना केली आहे हे ज्यूरीला कळावे म्हणूनच हा मुद्दा मी पुढे आणला. सायमन गव्हर्नर साहेब एक बोलतात व अधिकारी दुसरे करितात ह्या गोष्टीची वर्तमानपत्रानी तक्रार केली आहे. लोक सक्तीने भरत आहेत. पुढे संकटे काय येतील ह्याची चिंता त्याना लागून राहिली आहे. तेव्हा केवळ गोड भाषेच्या हुकमाने किंवा सहानुभूतीने काम भागावयाचे नाही तर सरकारने याहून अधिक लक्ष घातले पाहिजे. आणि खालचे अधिकारी कसे काम करतात हे गव्ह- र्नरसारख्यानी पाहिले पाहिजे इतकेच टिळकानी लिहिले आहे. डार्लिंग—शेवटचे वाक्य पहा. त्यात असे म्हटले आहे की हा प्लेग लव- कर न थांबला तर प्लेगच्या उपद्रवापेक्षा सोजीर लोकांचा उपद्रवच आम्हाला अधिक जाचक होईल. आणि हे सगळे कर्ज म्युनिसिपालटीवर लादले तर १०-