पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ लो० टिळकांचे चरित्र भाग १ अंतर्गत राज्यव्यवस्थेसंबंधानेहि सरकारामध्यें व मजमध्ये विशिष्ट मतभेद आहे. परंतु त्यामुळे माझी वृत्ति किंवा माझी कृत्ये इंग्रज सरकाराबद्दल द्वेषभाव व्यक्त करणारी आहेत असे म्हणणे असमंजसपणाचे आहे. माझा हेतु अगर इच्छा केव्हाच अशा प्रकारची नव्हती. मी एकदाच व कायमचे असे सांगून ठेवतो की आयर्लंडातील होमरूलपक्षाचे आयरिश लोकाप्रमाणे आमचा प्रयत्नहि चालू राज्य पद्धतीत सुधारणा घडवून आणण्याचा असून राज्य बुडविण्याचा नाही आणि मी निःशंकपणे असे म्हणतो की हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागात अत्याचाराचे जे प्रकार घडून आलेले आहेत ते माझ्या स्वभावाला प्रतिकूल आहेत इतकेच नव्हे तर अशा कृत्याच्या योगाने आमच्या राजकीय प्रगतीचे पाऊलहि दुर्दैवाने बरेचसे मागे पडले असेहि माझे मत आहे. व्यक्तिशः किंवा सार्वजनिक यापैकी कोण- त्याहि दृष्टीने विचार केला तरी अशा प्रकारची कृत्ये एकसारखीच दोषार्ह होत व ही गोष्ट मी पूर्वीहि अनेक वेळा बोलून दाखविली आहे. "इंग्रजी राज्यातील केवळ सुधारलेल्या राज्यपद्धतीमुळेच नव्हे तर सदर राज्य- पद्धतीने हिंदुस्थानातील निरनिराळ्या जाती व लोक यांचे एकीकरण होऊन त्यातून कालांतराने संयुक्त हिंदी राष्ट्र निर्माण होण्याचाहि संभव असल्यामुळे इंग्रजी राज्या पासून हिंदुस्थानचा अगणित फायदा होत आहे असे जे म्हणतात ते बरोबर आहे. स्वातंत्र्यप्रिय ब्रिटिश लोकाखेरीज दुसरे कोणीही राज्यकर्ते जर येथे असते तर त्यानी अशा प्रकारचे राष्ट्रीय ध्येय मनात आणून त्याला नामरूप दे- ण्याच्या कामी आम्हास मदत केली असती असे मला वाटत नाही. हिंदुस्थाना बद्दल मनात कळकळ असणाऱ्या प्रत्येक इसमास हे व याचप्रमाणे इंग्रजी राज्या- पासून होणारे दुसरे फायदे पूर्णपणे अवगत आहेत आणि इंग्रजी बादशाही तख्ता- बद्दल आमच्या सर्वांचे मनात असलेली राजनिष्ठेची भावना व मनोवृत्ती एकवटून व्यक्त होण्यास कारण झालेला सध्याचा विकट प्रसंग पर्यायाने आम्हास उपकार- कच आहे असे माझे मत आहे. “जर्मनीच्या बादशहाने अनेक तहनामे आणि पुनः पुनः दिलेली राज्याखंड- त्वाची अभिवचने मोडून एका कमकुवत संस्थानाच्या सरहद्दीवर स्वारी केल्यामुळे सदर संस्थानाच्या बचावासाठी जर्मन बादशहाचे विरुद्ध इंग्लंडास हाती शस्त्र धरणे भाग पडले आहे हे आपणास माहीत आहेच. अशा बिकट प्रसंगी प्रत्येक हिंदी प्रजाजनाने- मग तो लहान असो वा मोठा असो श्रीमंत असो वा गरीब असो-इंग्रज सरकारास आपल्याला शक्य असेल तेवढी मदत करून पाठबळ देणे हे त्याचे कर्तव्य आहे असे माझे दृढ मत आहे आणि यासंबंधी लोकमत जोराने व्यक्त करण्याकरता इतर ठिकाणी घडून आल्याप्रमाणे सर्व पक्षाच्या जातीच्या व वर्गाच्या लोकांची जाहीर सभा पुण्यासहि भरविण्यात यावी त्याला आता किंचि- तही विलंब लावू नये असे माझे म्हणणे आहे. अशा गोष्टीला पूर्वीच्या दाख- ल्याची केव्हाच जरूर नसते पण कोणास तो पाहिजेच असेल तर सन १८७९-