पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो० टिळकांचे चरित्र भाग ४ खून झाला म्हणून राजद्रोहाला आळा घालणे हे सरकारला जरूरीचे वाटले असेल. नाही असे मी म्हणत नाही. (ह्या ठिकाणी कागदपत्राची पुस्तके ज्यूरीला वाचण्याकरिता देण्यात आली.) डार्लिंग – पण तुम्ही जी वाक्ये वाचता त्यातील काहीबद्दल तुम्ही मुळात तक्रार केलेली दिसत नाही? सायमन होय. कदाचित तक्रार करण्यासारखी काही वाक्ये असताना ती फिर्यादीत घातली नसतील. म्हणून बाकीच्या बद्दलची तक्रार शिल्लक राहात नाही असे नाही. ज्या गोष्टींचा संबंध नाही त्या गोष्टींचा संबंध प्रतिवादीने जोडला असे मी म्हणतो. आणि तो संबंध खरा कसा हे प्रतिवादीने दाखविले पाहिजे. राज- द्रोह हा केवढा मोठा गुन्हा समजावा ह्याबद्दल मोठमोठ्या लोकांतहि मतभेद आहेत. इकडे आपल्या देशात आज शांतता आहे म्हणून राजद्रोह हा भयंकर गुन्हा वाटेल. पण हिंदुस्थानात अस्वस्थता असल्यामुळे राजद्रोहाला तसे भयंकर स्वरूप येत नाही. शिवाय रँडसाहेबाच्या खुनापूर्वी काय काय गोष्टी घडत होत्या, प्लेगचा त्रास व प्लेगच्या अव्यवस्थेचा जुलूम किती असह्य झाला होता इत्यादि गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत. ह्या प्लेगच्या बाबतीत लोकाना किती त्रास झाला हे ह्या कागदात नमूद आहेच. आणि त्यामुळे लोकांची मने किती बिथरली असतील ह्याची कल्पना येऊ शकेल. अशा वेळीहि टिळकानी लोकाना लेगप्रतिबंधक उपाय चालू देणे लोकाच्या फायद्याचे आहे असेच सांगितले होते. पण सोजीर लोकानी घरात शिरणे स्त्रियांचा अपमान होणे ह्या गोष्टी प्लेगच्या व्यवस्थेत येता- तच असे नाही. अशा गोष्टी मुंबईस कराव्या लागल्या नाहीत मग त्या पुण्यास का केल्या १ तरीपण आपले इकडे ज्या गोष्टी लोक सोसणार नाहीत त्या गोष्टी पुण्यास लोकानी निमूटपणे सोसल्या आहेत. कायद्याचे बंधन सोसले पाहिजे असेच टिळकानी सांगितले होते. सार्वजनिक सभेच्या अर्जात सगळ्या गोष्टी व्यवस्थित पणे सांगितलेल्या आहेत. (ह्या ठिकाणी सार्वजनिक सभेत कोण होते व हिंदु- प्रमाणे मुसलमान होते की नाही वगैरे अवांतर गोष्टींची चर्चा झाली.) टिळ- कानी प्लेग म्हणजे काय त्याचे स्वरूप कसे असते प्लेगप्रतिबंधक उपाय कोणता वगैरे गोष्टींची चर्चा आपल्या पत्रातून लोकांच्या माहितीकरिता सांगोपांग केली आहे. ती वाचली तर असे दिसून येईल की केवळ असंतोष उत्पन्न करणे एव ढाच टिळकांचा हेतू नव्हता. टिळक हे चळवळे असले तरी सच्चे होते. प्रसंग- विशेषी लोकानी कसे वागावे हे ते जाणत व सांगत. टिळकानी प्लेग इस्पितळ काढून लोकांची सोय केली होती. तात्पर्य ह्या वेळच्या केसरी मराठा पत्रातील एकंदर लेखावरून टिळकांचे विवेचक धोरण दिसून येते. कार्सन–पण रँड साहेबासंबंधाने लिहिताना 'बाईच्या लोकाना शिक्षा दिलेले हे रँड साहेब' असे म्हटले होते? सायमन – खरी गोष्ट होती तीच सांगितली.