पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ विलायतेतील सुनावणी सायमन – होय बरोबर. मात्र दोहोतील निकाल निरनिराळ्या वेळी झालेला आहे. डार्लिंग—न्यायमूर्ति चंदावरकर हे जातीने हिंदु आहेत काय? सायमन - - होय. माझा मुद्दा असा आहे की चिरोलसाहेबानी लेखांचे पुस्तक बनविताना तोपर्यंत घडलेल्या सर्व गोष्टींची चौकशी करावी तितकी केली नाही. टिळक फौजदारी खटला होऊन १९०४ मध्ये सुटलेले होते आणि पुस्तक १९१० साली लिहिले गेले. एवढ्या अवधीत प्रतिवादीला सर्व गोष्टी कळावयाला पाहिजे होत्या. आणि टिळकावरील फौजदारी खटल्याचा उल्लेख करावयास नको होता. चंदावरकरांचा निकाल टिळकाविरुद्ध गेला त्याला प्रतिवादीने फार महत्त्व दिले आहे. पण टिळक स्वतःच्या फायद्याकरिता हे काम करीत नव्हते. ट्रस्टी म्हणून करीत होते. असे असता चंदावरकरांच्या निकालाने टिळकांच्या चारित्र्याला धक्का बसला असे प्रतिवादीने विनाकारण लिहिले आहे. टिळक हे राजकीय दृष्ट्या नाव- डते असतील. पण त्यांच्या खाजगी वर्तनावर असे शिंतोडे का उडवावे? टिळ- कांच्या जागी चिरोलसाहेब असते तर त्यानी असे केले नसते काय? प्रतिवादीचे अज्ञान म्हणा किंवा द्वेषबुद्धि म्हणा त्यांच्या हातून असा प्रमाद झाला आहे. टिळकानी सरकारला उपद्रव दिला त्याबद्दल त्यानी दोन वेळ तुरुंगवास भोगला आहे. पण त्यामुळे त्याना खाजगी रीतीने नावे ठेवावी हे काय? रँड व आयर्स्ट ह्यांच्या खुनाकरिता टिळकाना व्यक्तिशः कोणीच जबाबदार धरलेले नाही. ह्या बाबतीत चिरोल- साहेबानी अगदी ताळ सोडून लिहिले आहे. ह्या बाबतीत स्वतः कार्सन साहेबावर कसे दोषारोप झाले व त्याचा डिफेन्स त्यानी कसा दिला होता हे ध्यानात आणा- वयाला सांगतो. हिंदुस्थानात आरोपीना विशेषतः खुनी आरोपीना अनेक प्रका- रचे प्रश्न विचारीत असतात. त्यांची लांबलचक जवानी घेतात. मग ते काय वाटेल ते बरळत सुटतात. आणि वडाची साल पिंपळाला लावून जॅकसनच्या खटल्यातील आरोपीनी सांगितलेली गोष्ट चिरोल साहेबासारखे रँड व आयर्स्ट ह्यांच्या खुनाला जोडतात. चिरोल साहेबानी असे भासविले आहे की कान्हेरे याला फाशीची शिक्षा व टिळकाना मात्र काही वर्षाची सजा हा अन्याय झाला! का तर टिळक हे पुण्याचा खून व नाशिकचा खून ह्या दोहोबद्दल जबाबदार आहेत! म्हटले तसेच रँडसाहेबांच्या डार्लिंग–पण जॅकसनचा खून केला त्यानी खुनी माणसानीहि म्हटले आहे? सायमन–नाही तसे त्यानी म्हटले नाही. टिळकांवर फक्त राजद्रोहाचा 'खटला झाला. आणि खुनाच्या खटल्यात टिळकाचा काही संबंध नव्हता असे खुद्द सरकारी वकिलाने म्हटले होते. राजद्रोह वेगळा आणि खून वेगळा. शिवाय राजद्रोह ह्या शब्दाचा अर्थ स्ट्रॅची साहेबानी केला त्याच्यासंबंधानेहि मला काही म्हणता येईल. आपल्या इकडे इंग्लंड आयर्लंडातहि अशा प्रकारचे खटले झालेले आहेत. दि० उ... १९