पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो० टिळकांचे चरित्र 0 भाग ३ सायमन – ह्या मुद्यावर कागदपत्र तर तुम्ही खूप देऊ केले आहेत. मग त्यावरून त्यातून काय निघेल ते पाहू! असो. टिळकांच्या वर्तमानपत्रातून उत्स- वाचे समर्थन केले आहे. गणपति हा हिंदूंचा मोठा देव. शिवाजी हा त्यांच्या इतिहासातील मोठा पुरुष. काम्वेल हा इकडे ज्यावेळी पहिल्या चार्लस राजाचा शिरच्छेद करीत होता त्याचवेळी तिकडे शिवाजी झाला. शिवाजी व अफझुल- खान ह्यांच्याबद्दल प्रतिवादीने बरेच लिहिले आहे. पण इकडे आपली रिकाम- टेकडी शाळेतील मुले चार्लस राजाचा वध क्रॉम्बेलने केला तो बरोबर को चूक ह्याचा जसा रिकाम्या वेळी वाद घालीत असतात तशान्त्र प्रकारचे शिवाजी व अफझुलखान ह्या संबंधाचे लेख टिळकांच्या दोनहि व इतर वर्तमानपत्रातून आलेले आहेत. लॉर्ड रे सारखे इंग्रज लोक ह्या वादात लक्ष घालीत. मग टिळकांनी ह्या विषयाची विशेष चर्चा केली असल्यास काय नवल? माझे म्हणणे इतकेच की शिवाजी व गणपति उत्सव केले तरी तेवढ्यामुळे दंगेखोर व राजद्रोहि असले आक्षेप टिळकांच्यावर कोणासहि लादता येत नाहीत. शिवाजीस्मारकाकरिता सरकारनेहि वर्गणी दिली होती. तिसरा मुद्दा लोकापासून पैसा उकळण्याचा. टिळकांचे स्वतःचे पत्र आहे व इतर कित्येक पत्राशी त्यांचा संबंध होता ही गोष्ट खरी. त्यातून निरनिराळ्या वर्गण्या प्रसिद्ध होत हेहि खरे. पण त्या राष्ट्रीयशाळा वगैरे संस्थाकीरता होत्या. पण कडक लेख लिहून अगर तसे लेख लिहिण्याची धमकी घालून टिळकानी कोणाकडून पैसे उकळले असे म्हणणे ही बेअब्रु होय. स्वराज्याच्या तिजोरीत दरवडेखोर पैसे आणून भरीत असे विधान प्रतिवादीने केले आहे ते तरी अत्यन्त बेअब्रुकारक होय. प्रतिवादीला याबद्दल नीट पुरावा द्यावा लागेल. चवथा मुद्दा ताईमहाराज प्रकरणाचा होय. तो समजण्याला तुम्हाला बराच त्रास पडेल. बऱ्याच भानगडीचा असा तो खटला होता. (ह्या ठिकाणी ताई महाराज दत्तक प्रकरणासंबंधाने सर सायमन ह्यानी पुष्कळशी हकीगत सांगितली आणि ती प्रिव्ही कौंसिलच्या निकालापर्यंत आणून भिडविली.) डार्लिंग – प्रिव्ही कौंसिलमध्ये टिळकासारखा निकाल झाला काय? - सायमन—होय. इतकेच नव्हे तर खालच्या कोर्टाची टीका सर्वस्वी गैर होती असेच प्रिव्ही कौंसिलाने ठरविले. कार्सन- - पण ही सगळी हकीकत हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतरची नव्हे काय? सायमन – होय. पण माझा मुद्दाच हा की सर्वस्वी निरपराधी मनुष्याला हा इतका त्रास सोसावा लागला व फौजदारी खटलाहि करून घ्यावा लागला. डार्लिंग – दिवाणी फौजदारी खटल्यात प्रथम प्रथम टिळकांच्या विरुद्ध निकाल झाला. पण दोन्ही प्रकरणातील शेवटचा निकाल टिळकाना अनुकूल असा झाला असेच की नाही १