पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ विलायतेतील सुनावणी कच्ची हकीकत मी पुराव्यात आणू इच्छितो. परंतु त्या कामी हिंदूंचा दोष नव्हता असे टिळकांचे म्हणणे आहे. इतर पुष्कळ लोकांचेहि तसेच म्हणणे होते. कसेहि असो. ह्या दंग्याना टिळक किंवा गोरक्षणी सभा मूळ कारणीभूत झालेली नव्हती. टिळकांची दोन वर्तमानपत्रे होती. एकाचे नांव केसरी व दुसऱ्याचे नांव मराठा. 'केसरी' ह्या मराठी शब्दाचा अर्थ सिंह असा आहे. कार्सन– इंग्रजाला जसे जॉन बुल (बैल) म्हणतात तसाच हा टिळकांचा सिंह. 'मराठा' पत्र इंग्रजीत चालते. आणि त्याचा संपादक हा इंग्रजी भाषा मोठी शुद्ध लिहितो. डार्लिंग—टिळक कोण आहेत हे तुम्ही सांगितले आहे. चिरोल कोण आहेत हेहि सांगाना? मला त्यांचे फक्त नाव माहित आहे. ज्यूरीला तर तेहि माहीत नसेल. सायमन–चिरोल हे मोठे लेखक आहेत. ते टाइम्स पत्रात लिहितात. त्यांची काही पुस्तकेहि प्रसिद्ध आहेत. डार्लिंग—पण चिरोलसाहेबांचा व - हिंदुस्थानचा संबंध काय? सायमन–ते ह्या पुस्तकाचे कर्ते आहेत इतकेच मला माहीत आहे. ते मोठे असतील पण त्यांची मला अधिक माहिती नाही. (मराठी पत्रातील उतारे वाचून दाखवून दंग्यांचा पूर्वापर वृत्तान्त थोडासा सांगितला) हिंदुमुसलमानांच्या दंग्याला कारणीभूत कोण ह्याविषयी लोक व सरकार यांच्यात वाद चालू आहे. ह्यासंबधाने पोलिस कमिशनरचा रिपोर्ट टिळकानी दाखल केला आहे. ह्या रिपो- टर्टावरून प्रतिवादीने टिळकाविषयी केलेले विधान बरोबर नव्हते असे ठरत आहे. गोरक्षण मंडळ्या टिळकानी मूळ काढल्या नसता त्या त्यांनी काढल्या व त्याच दंग्याना कारणीभूत झाल्या हे म्हणणे बेअब्रुकारक होते. दुसरा मुद्दा असा की टिळकानी नातू बंधूंच्या साहायाने आखाडे काढले काय? याबद्दलहि प्रतिवादीने भलतेच काही लिहिले आहे. पण मी पुढे असे दाखविणार आहे की धर्माच्या बाबतीत नातू ह्यांचे व टिळकांचे पटत नव्हते. टिळकानी एखादा आखाडा काढला असेल पण तो इंग्रजी राज्य उलथून पाडण्याकरिता असे कोणाला कसे म्हणता येईल? मराठे लोक हे जातीने तालीमबाज आहेत. त्याना तालमेला आखाडे लागतातच. (येथे सायमन ह्यानी केसरीतील टिळकांच्या एका भाषणाचा रिपोर्ट वाचून दाखविला). डार्लिंग – ह्या भाषणावरून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात तालिमबाजीचा समावेश केल्याचा टिळकाना मोठा अभिमान वाटतो असे दिसून येत नाही काय? आमच्या ईंटन व हॅरो येथील शाळातून असा उपदेश केला पाहिजे. सायमन – अगदी बरोबर. पण हे सर्व हिंदुस्थानातून इंग्रजाना हाकलून देण्याकरिता असे म्हणणे हीच बेअब्रू! कार्सन—तुम्ही दर्शविता तेवढी ती हलकी गोष्ट नाही.