पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो० टिळकांचे चरित्र सरजॉन सायमन यांचे भाषण प्रथम वॅ. स्पेन्स ह्यानी फिर्याद वाचून दाखविली. नंतर ह्या प्रकरणाचे महत्त्व ज्यूरीच्या लक्षात यावे म्हणून सर जॉन सायमन ह्यानी विस्तृत भाषण करून सांगितले. ते म्हणाले: - "ही फिर्याद अब्रूनुकसानीची आहे. उभयपक्षी यात किती कागदपत्रे दाखल झाली आहेत हे त्या पलिकडच्या बाकावर ज्या प्रचंड राशी मांडण्यात आल्या आहेत त्यावरून दिसून येईल. हे सगळे कागद वाचण्याला आपणाला वेळ नाही व कारणहि नाही. प्रतिवादीने त्यातील बहुतेक आपला पुरावा म्हणून दाखल केला आहे. त्यात पुष्कळसे वर्तमानपत्रातील उतारे आहेत. त्यापैकी काही वर्तमानपत्राशी टिळकांचा संबंध होता. काहीशी नव्हता. ज्या पुस्तकावर फिर्याद झाली आहे त्यातील काही लेख 'लंडन टाइम्स' पत्रात प्रसिद्ध झाले होते.. १८ भाग ४ "फिर्यादीविषयी थोडी माहिती सगतो. टिळक हे उच्च जातीतील ब्राह्मण आहेत. ह्या जातीने हिंदुस्थानच्या इतिहासात मोठा कार्यभाग केला होता. टिळ- कांची माहिती इकडे आपणाला फारशी असणार नाही हे उघडच आहे. आप णाला आपली कामे. हिंदुस्थानच्या गोष्टीत तुम्ही लक्ष किती घालणार? टिळकांचे वय आज ६२ वर्षांचे आहे. हिंदुस्थानच्या मानाने त्याना वृद्धच म्हणावे लागेल. पुष्कळ वर्षे ह्यानी सार्वजनिक कार्य केले आहे. काही लोक त्याना चळवळे म्हणतात. अधिकाऱ्याना 'हा मोठा उपद्रव आहे' असे वाटण्यासारखी चळवळ त्यानी केली आहे. पण ती केवळ लोकहिताच्या दृष्टीने त्यांचे इतिहासाचे ज्ञान फार खोल आहे. स्वतः त्यानी शिक्षणाचे कार्य फार मोठे केले आहे. प्लेगच्या दिवसात त्यानी फार मोठी लोक- सेवा केली. हिंदुस्थानातील लोक वरिष्ठ प्रकारचे राजकीय अधिकार मागू लागले आहेत. आणि माँटेग्यू चेम्सफर्ड ह्यानी एक योजनाहि पुढे आणली आहे. फिर्या- दीने फिर्यादीत मांडलेल्या तक्रारी आपणाला अर्थातच अपरिचित स्वरूपाच्या असणार. उदाहरणार्थ गोरक्षणाच्या चळवळीसंबंधाने चिरोल साहेबानी लिहिलेले लेख. हिंदुस्थानातील लोक गाईला पवित्र मानतात. दुसरा विषय तालमेच्या आखाड्यांचा तिसरा विषय धाकदपडशाने पैसे उकळण्याचा. चवथा विषय ताई महाराज प्रकरणाचा. पांचवा रँड व आयर्स्ट ह्यांच्या खुनाचा सहावा जॅकसन साहेबांच्या खुनाचा ह्या सहाहि विषयांवर लिहिताना टिळकांची बेअब्रू करण्यात आली आहे. आणि ती बेअब्रू होय किवा नव्हे हेच ज्यूरीला ठरवा- वयाचे आहे.

" टिळकानी हिंदुमुसलमानांच्या दंग्याचा फायदा घेऊन गोरक्षणाची चळवळ पुढे ढकलली व गोरक्षण सभा काढली असे प्रतिवादीने लिहिले आहे. या चळ- वळीत टिळकानी मोठमोठ्या सभा भरविल्या. सभातून दंगे केले असेहि म्हणण्यात आले आहे. ह्या सर्व गोष्टी मुसलमानाना राग आणण्याकरिता केल्या असे प्रति- वादी लिहितो. पण टिळकाना ही गोष्ट नाकबूल होती. मुंबईस दंगे झाले त्याची