पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ विलायतेतील सुनावणी सॉलिसिटर डाउनर जॉन्सन यांचे टिळकाना पत्र १७ लंडन २९ ऑक्टोबर १९९७ तुम्ही जो पत्रव्यवहार मिळवू शकला त्यावरून सरकारने चिरोलसाहेबांच्या सॉलिसीटर्सना फार मदत केली असे उघड दिसते. सरकारी अधिकाऱ्यानाहि ती गोष्ट नाकबूल करता आली नाही. नाशिक प्रकरणातील चिशेल यांच्यातर्फेचे दोन्ही साक्षीदार फुकट गेलेले दिसतात. कारण तुमचा व नाशिक क्लवच्या लोकांचा संबध नव्हता हे त्यावरून स्पष्ट होते. खटला नाताळच्या पूर्वी निघत नाही आणि फेब्रु- आरी अखेपर्यंत लांबवून घेताहि येईल. खटला निघण्यापूर्वी काही दिवस तरी तुम्ही येथे आले पाहिजे. कारण तुमची साक्ष होणारच व त्यातील मुद्दे काय असावे हे तुमच्याशी वाटाघाट करूनच ठरविले पाहिजे. खर्चाबद्दल रकम कोर्टात लवकरच गुदरावी लागेल. त्याविषयी प्रतिवादीकडून तगादा होईलसे दिसते. आम्ही हरकत घेऊच व म्हणूच की सरकारच्या मदतीने प्रतिवादीला पुरावा मिळाला म्हणून खर्च फारसा पडला नसेल. तरी पण कोर्ट आमची तक्रार मानी- लच असा भरंवसा नाही. प्रतिवादीच्या खर्चाशिवाय आपल्या खर्चाची तजवी- जहि झाली पाहिजे. बॅरिस्टर लोकांचा खर्च पुष्कळच येईल. नक्की आकडा तारे- नेहि कदाचित् कळवू म्हणून रकम तयार ठेवावी. सर जॉन सायमन यानी लष्करी खात्यासंबधाने काही कामगिरी पत्करल्यामुळे ते तरी आपणाला मिळतील की नाही याची शंका वाटू लागली आहे. सर एडवर्ड कार्सन व मि. ड्यूक हे दोघेहि आपल्या हातचे गेलेच. आता हे तिसरेहि जातात की काय पहावे. बॅरिस्टर वर्गा- तील लोक हल्ली इतके कमी झाले आहेत की एखादा चांगला मिळणे मुष्किलीचे होऊन बसले आहे. होलमन ग्रेगरी यांचेहि नाव आमच्या डोळ्यापुढे आहे. ते प्रमुख बॅरिस्टरापैकीच आहेत. तथापि आपले दुय्यम बॅरिस्टर मि, स्पेन्स याना विचारल्याशिवाय काहीच नक्की नाही असे समजा. (४) विलायतेतील सुनावणी टिळकांच्या फिर्यादीच्या सुनावणीला तारिख २९ जानेवारी १९१९ रोजी सुरवात झाली. न्यायाधिकारी डार्लिंग साहेब होते. पण विलायतेत दिवाणी दावे देखील ज्यूरीपुढेच चालत असल्याकारणाने याहि प्रकरणी ज्यूरी नेमण्यात आली होती. खटल्याच्या महत्त्वामुळे ज्यूरी साधी नसून स्पेशल म्हणजे वरच्या प्रतीच्या लोकांची होती. टिळकातर्फे नेक नामदार सर जॉन सायमन व स्पेन्स हे बॅरिस्टर्स व डौनर जॉनसन हे सॉलिसिटर होते. प्रतिवादीतर्फे सर एडवर्ड कार्सन सर एलिस ह्यूम बुइल्यमस व यूस्टेस हिल्स् हे बॅरिस्टर्स असून सोम्स एडवर्ड व जोन्स हे सालिसिटर्स होते.