पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो० टिळकांचे चरित्र रॉबर्टसन यांचे टिळकाना उत्तर भाग ४ पुणे २८ जुलै १९१७ फक्त चिरोल यास दाखविलेल्या कागदांच्या नकला नेण्याची अगर पहाणी करण्याची तुम्हास परवागी देता येईल. पण तुमच्या पत्रात तुम्ही मागता ते सर्व कागदपत्र गुप्त असल्या कारणाने ते पाहण्याची परवानगी तुम्हास देता येत नाही. टिळकांचे रॉबर्टसन यास पत्र पुणे ४ ऑगस्ट १९१७ टिळकांचे रॉबर्टसन यास पत्र मी मागितलेले कागदपत्र दाखविता येणार नाहीत कारण ते गुप्त आहेत असे तुम्ही लिहिता. पण तुमची हरकत योग्य वा अयोग्य हे ठरविण्याचा अधि- कार न्यायकोर्टाचा आहे. तथापि मला एक गोष्ट कळली तर बरे होईल. आपण गुप्त म्हणता ते कागदपत्र सेक्रेटरी ऑफ स्टेटकडे पाठवावे अगर ते सीलबंद करून कमिशनरकडे पाठवावे. तुमच्या वरील 'गुप्त'पणाच्या हरकतीबद्दल हे कागद पत्र लंडन कोर्टमध्ये गेले म्हणजे प्रीव्ही कौन्सिल काय ते ठरवील. सरकारच्या या हरकतीबद्दल मी कायदेशीर रीतीने भांडणार आहे. म्हणून मंगळवारी कोर्टात हजर राहून कोर्टापुढे तुमचे म्हणणे तुम्हास मांडावे लागेल. रीतसर समन्स तुम्हास येईलच. २३ ऑगस्ट १९१७ सरकार व चिरोलचे सालिसिटर यामधील झालेला पत्रव्यहार दास्त्रवि- ण्यास तुम्ही हरकत घेता त्याबद्दल मी भांडणार आहे. म्हणून हे कागदपत्र तुम्हास कोर्टात आणावे लागतील. कारण हरकत घेण्याचा अधिकार तुमचा नाही कोर्टाचा आहे. रॉबर्टसन यांचे टिळकाना उत्तर २४ ऑगस्ट १९१७ तुमचे ४ ऑगस्टचे पत्र पोचले. त्याचे उत्तर असे की तुम्ही म्हणता ती अनंत कान्हेरे याची साक्ष सरकारचे संग्रही नाही. कमिशन पुढील कागदपत्र विलायतेस गेले. त्यानंतर टिळकांचे सॉलिसिटर यांनी त्यांना खालील प्रमाणे पत्र लिहून या पुराव्या संबंधी आपला अभिप्राय कळविला. ते पत्र असे: -