पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ टिळकांचा जाहीरनामा ११ म्हटले होते की पूर्वी रिव्हॅनाविंकल या नावाच्या अरण्यात गेलेल्या एका मनुष्यास तेथेच गाढ निद्रा लागून पुष्कळ दिवसानंतर तो घरी आल्यावर त्याची जी स्थिती झाली तद्वतच पुष्कळ अंशी माझी अवस्था झालेली आहे. माझ्या सहा वर्षांच्या गैरहजेरीत काय काय घडून आले यासंबंधाने आपली माहिती पुरी करून घेण्यास आणि हिंदुस्थानात दरम्यान ज्या ज्या गोष्टी घडल्या त्यांचा आढावा घेण्यास यानंतर मला बरेच प्रसंग आले. त्यावरून मला आपणास खात्रीने असे सांगता येते की वर्तमानपत्रांच्या कायद्यासारखे काही प्रकार यद्यपि घडून आले असले या प्रकारासंबंधी या स्थळी मला विस्ताराने चर्चा करण्याची जरूर नाही - तथापि हिंदुस्थान देश आपणास अत्यंत इष्ट असलेले ध्येय प्राप्त करून घेण्याचा मार्ग धिमेपणाने आक्रमण करील याबद्दल निदान मी तरी निराश झालेला नाही. लॉर्ड मोल व लॉर्ड मिंटो यांच्या कारकीर्दीत ज्या सुधारणांचा उपक्रम झाला त्यावरून असे दिसून येईल की राज्यकारभारांत प्रगतिपर फेरबदल करण्याची आवश्यकता सरकारच्या पूर्णपणे लक्षात आलेली असून राज्यकारभाराच्या कामी लोकाशी दिवसानुदिवस अधिकाधिक संबंध ठेवण्याची सरकारची इच्छा आहे. या गोष्टी- वरून अधिकारी व प्रजा याजमधील परस्पर विश्वास बराच वाढत चालला अस- त्याचे आणि प्रजेची गाऱ्हाणी ऐकून ती दूर करण्याचा सतत प्रयत्न सुरू अस- ल्याचे दिसून येते असे म्हणता येईल आणि आम्हीहि ते मान्य करणे रास्त होईल. सार्वजनिक दृष्ट्या विचार करता हा इतका फायदाच झाला असे मला वाटते. आणि हा फायदा जरी सर्वांशी निर्भेळ नसला तरी मला अशी दृढ आशा वाटत आहे की अखेर या राजकीय सुधारणात जे काही चांगले आहे ते शिल्लक व कायम राहील आणि ज्याबद्दल आमची हरकत आहे ते नाहीसे होईल. कित्येकाना माझे हे म्हणणे आशावादीपणाचे दिसेल पण मी श्रद्धेने ज्या गोष्टी स्वीकारल्या आहेत त्यापैकी ही एक असून, फक्त अशा प्रकारचा विश्वास आपल्या देशाच्या कल्याणासाठी सरकारच्या सहकार्यतेने झटण्याची आहास स्फूर्ति होण्यास कारण होतो असे माझे मत आहे. " दुसऱ्या एका गोष्टीचाही येथे उल्लेख करणे जरूर आहे. माझ्या सहा वर्षांच्या गैरहजेरीत येथील व इंग्लंडातील इंग्रजी पत्रात उदाहणार्थ मि. चिरोल यांच्या पुस्तकात माझे लेख व कृत्ये यांचा असा अर्थ करण्याचा प्रयत्न झाल्याचे मला दिसून येते की त्यामुळे अत्याचाराच्या कृत्याना प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष चिथावणी मिळाली अथवा मी जी भाषणे केली ती हिंदुस्थानातील इंग्रजसरकारचे राज्य उलथून पाडण्याचे हेतूने केली. मी आपला बचाव करण्यास नागरिक या नात्याने स्वतंत्र नव्हतो अशा वेळी हे प्रयत्न करण्यात आले ही शोचनीय गोष्ट होय. तथापि या पहिल्याच सार्वजनिक प्रसंगी मजवरील या घाणेरड्या व सर्वस्वी निरा- धार अशा आरोपाचा मनःपूर्वक तिटकान्याने निषेध करणे मला जरूर आहे. राजकीय चळवळ करणाऱ्या इतर लोकाप्रमाणे काही बाबीत किंबहुना काही अंशी