पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो० टिळकांचे चरित्र भाग ४ लॉरेन्स रॉबर्टसन मुंबई सरकारच्या न्यायखात्याचे सेक्रेटरी यानी आपल्या साक्षीत सरकारने चिरोलला जी मदत केली त्याबद्दल सांगितले. त्याचा सारांश असा- कागदपत्र दाखविण्यासंबंधाने टिळकानी सरकारला ४ ऑगस्ट १९१७ च्या पत्रात विचारले. पण त्यासंबंधी सरकारने मनाशी निश्चित धोरण ठरविले आहे. टिळकांचे २२ एप्रिलचे पत्र कौंसिलपुढे आता विचाराकरिता ठेवण्यात आले असेल. मी टिळकाना पाठविलेल्या पत्रात "मला असे कळविण्यास सांगितले आहे" असे मी लिहिले त्याचा अर्थ मी काय लिहावे याबद्दल मला कौंसिलचे लेखी हुकूम होते. हे हुकुम मी येथे दाखविण्याला तयार नाही. चिरोलच्या सॉलिसिटर्सनी कागदपत्राची पहाणी करण्यावद्दल विनंति केली. हे आमच्याकडून टिळकाना कळविले गेले नाही. ही बाब कासिलपुढे गेली होती. (यावर बिनिंग साहेबानी या व अशा सर्व प्रश्नाना हरकत घेतली.) माझी व चिरोल साहेबांची ओळख आहे. ही केस चालू असता सरकारने त्याना कागदपत्र पाहाण्याची परवानगी दिली होती. १२ प्र०- -चिरोल यांच्या सॉलिसिटर्सच्या पत्राला उल्लेखून तुम्ही एका पत्रात म्हणता की 'साक्षीदाराची गाठ घालून त्यांच्याशी आमचा संबंध घडवून आणा. या वाक्याचे स्पष्टीकरण कराल काय? उ०. -तुमची इच्छा असेल तर करीन. (यावर चिरोल व सरकार याजमधील गुप्त रीतीने झालेला पत्रव्यवहार कोर्टात उघडकीस आणता येत नाही अशी जोराची हरकत बिनिंग यानी घेतली. व सांगितले की वाटेल तर सील करून हा गुप्त पत्रव्यवहार प्रीन्हि कौन्सिलकडे पाठवा. ते निकाल देतील, पण टिळकाना हा पत्रव्यवहार दाखविण्याला आम्ही तयार नाही.) रॉबर्टसन यानी असे सांगितले की नाशिक केस खेरीज इतर साक्षी- दारांच्याकडेहि संधान लावण्याला पोलिस अधिकाऱ्यांना सरकारने सांगितले होते. तसेच चिरोल साहेबांच्या वतीने म्हणून हिंदुस्थानाबाहेरील सेल्बी जाइल्स व प्रायर या साहेबानाहि सरकारने साक्ष देण्यासंबंधी विचारले. यांची व इतरांची नांवे कोणी सुचवली ते विचारूं नका. अशा गोष्टी उघडकीस न आणण्याचा आम्हाला कायद्याने हक्क आहे. फक्त ही तीन नावे सांगण्याबद्दलच मला सर कारची परवानगी होती. प्र०—सरकारने या खटल्यासंबंधी पुरावा गोळा करण्याकरिता ठिक- ठिकाणच्या कलेक्टराना लिहिले होते काय? तसेच शाळांचे हेडमास्तर डायरेक्टर ऑफ् पब्लिक इन्स्ट्रक्शन याहि लोकाना चिरोल साहेबांचे मुखत्यार (एजंट) म्हणून सरकारने लिहिले काय? (या प्रश्नाना बिर्निंग साहेबानी हरकत घेतली.) उ०-होय. अलवत. माझ्या समजुतीप्रमाणे सरकारने चिरोल साहेबांचे मुख- त्यार अगर एजंट अशाच नात्याने या कामी वर्तन केले. दुय्यम अधिकाऱ्यांच्या खर्चाबद्दल बजेटमध्ये खास व्यवस्था नव्हती. तरी माँटगॉमरी व त्यांचा कारकून