पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ कमिशनपुढील पुरावा १३ हे तीन महिने येथें मुंबईस स्पेशल ड्यूटीवर होते त्यांचा व चिरोलच्या सॉलि- सिटर्सचा पत्रव्यवहार चाले. माँटगॉमरी साहेबांची नेमणूक चिरोल अगर त्यांचे सॉलिसिटर यांच्या सांगण्यावरून केली नव्हती. हिंदुस्थानसरकारने सांगितल्यामुळे ती केली. टिळक मागतात त्या पोलिस डायन्या सरकारजवळ नाहीत. सरकारच्या हुकमावरून त्यांचा नाश करण्यात आला आहे. पोलीसने संग्रह करून जमविलेले टिळकांचे सार्वजनिक चरित्र मजजवळ आहे. सरकारने ते छापले आहे. शिवराम महादेव परांजपे यांच्या साक्षीचा सारांश असाः-ज्याला तुम्ही जहालपक्ष असे म्हणता ते नाव मला संमत नाही. मी त्याला स्वदेशी पक्ष असे म्हणेन. मी केसरीचा नियमित वाचक अगर वर्गणीदार नाही. प्र० स्वराज्य ह्या शब्दाने ब्रिटिश अधिकाऱ्यांचा अभाव असे तुम्ही समजता काय? उ० –असेच केवळ नाही. गव्हर्नर अगर लेफ्टनंट गव्हर्नर असे अधिकारी त्यात असू शकतील. तथापि टिळकांची व माझी राजकीय मते हटकून जुळतील असे नाही. प्र० - पण मुख्य मुख्य विषयासंबंधी तरी तुमची व त्यांची मते जुळत होती की नाही? उ० – मी काहीच सांगून स्वतःला बांधून घेऊ इच्छित नाही. नाशि- कच्या व्याख्यानास टिळक व मी दोघेहि हजर होतो. मी स्वदेशी व वहिष्काराची शपथ घेतली होती. स्वदेशी व बहिष्कार हे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मूळ टिळकानी काढलेले नाहीत. स्वदेशी ही कल्पना सार्वजनिक काकानी काढली. आणि बहि ष्कार हा वंगभंगातून निर्माण झाला. उलटतपासणीत परांजपे यानी सांगितले की काळ पत्राच्या फाइली मी कोगजे पोलिस ऑफिसर यांस दिल्या. त्याना त्या चिरोल खटल्याकरिता पाहिजे होत्या. पोलिस ऑफिसर या नात्यानेच मागत असाल तर फाइली घेऊन जा असे मी त्यास म्हटले व त्यावर पावती लिहून देऊन कोगजे फाइली घेऊन गेले. टिळकांचा अगर केसरीचा माझ्या काळ पत्राशी कोणत्याहि रीतीचा संबंध नाही. टिळकानी स्वतः माझ्या पत्नात काही लिहिले नाही. अगर प्रसिद्धीकरिता पाठविले नाही. तसेच मलाहि काही लिहावयास सांगितले नाही. मग ते त्यांच्या पत्रात असो अगर माझ्या पत्रात असो. काळ पत्न हे टिळकांचे मुखपत्र आहे या म्हणण्यात काडीचाहि सत्यांश नाही. प्र० - ज्या हेतूने अगर उद्दिष्टाने जे तच्च केसरी प्रतिपादन करीत होता त्याचाच फैलाव काळाने केला नाही काय? उ० – नाही. माझे पत्र अगदी स्वतंत्र होते. केसरी व काळ यानी संगनमताने अगर साहचर्याने कोणतीच गोष्ट कधीहि केली नाही, नरसिंह चिंतामण केळकर यानी सांगितले की टिळकाना पकडल्यानंतर ता. १९ सप्टेंबर १८९७ रोजी मराठा पत्राचा संपादक म्हणून मी डिक्लेरेशन केले.