पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कमिशनपुढील पुरावा कार होण्याचे ठरले. या फेरबदलाच्या सूचना १९०६ पासूनच येत होत्या. त्या- नंतर पैसे उभारणे हत्यारे जमा करणे वगैरे ठरवून १९०८ मध्ये मित्रमेळ्याचे क्रांतिकारक कटात रूपांतर झाले. १९०६ साली मित्रमेळ्याने नाशिक येथे टिळ- काना पानसुपारीस बोलाविले होते. काही वक्त्यानी भाषणे केली व उत्तरादाखल टिळकहि बोलले. प्र० - टिळकांनी त्याना त्यांचे मार्ग चूक असल्याबद्दल उपदेश केला काय? उ० नुसता उपदेशच नव्हे कानउघाडणीहि केली व न्याय्य आणि कायदेशीर मार्गानेच चळवळ करण्याबद्दल सांगितले. खासगी गुप्त सभेतहि त्यानी तेच सांगितले. या एका पानसुपारीच्या प्रसंगाखेरीज टिळकानी मित्रमेळ्याला कधीहि भेट दिली नाही. मित्रमेळ्याशी त्यांचा कसलाच संबंध नव्हता. भाग ४ धनाप्पा सिद्धराम अप्पा वाळवे हे व्यापारी असून नाशिकच्या कटात होते. त्यांच्या साक्षीचा सारांश असाः – मित्रमेळ्याचा सभासद होऊन स्वदेशी कापड व साखर मी वापरू लागलो. काळ व विहारी ही पत्रे वाचीत होतो. केसरीची भाषा भारदस्त म्हणून आम्हाला समजत नसे. १९०६ च्या गणपति उत्सवापूर्वी मित्रमेळ्याचा मी सभासद नव्हतो. प्र०—टिळकांची व मित्रमेळ्याच्या सभासदांची गुप्त मुलाखत झाली तेव्हा तुम्ही हजर होता काय? (या सूचक प्रश्नाला करंदीकर हरकत घेतात.) उ०- या गुप्त सभेची मला माहिती नाही. परंतु इतके नक्की सांगता येईल की मित्र- मेळ्याचे हेतु त्याची कृत्ये व हालचाली यांच्याशी टिळकांचा कोणताहि संबंध नव्हता. गणेश बळवंत वैद्य–यास नाशिकच्या खटल्यात काळेपाण्याची शिक्षा झाली होती. पण तो माफीचा साक्षीदार झाल्याने त्याची सुटका झाली. वैद्य याने जी साक्ष दिली तिचा सारांश असाः- आमच्या गुप्त संस्थेला एकादे नाव असे नव्हते. पण देशाला स्वराज्य मिळविण्याचा प्रयत्न करण्याची एक शपथ होती. बाँबचे साहित्य त्याकरिता आम्ही जमा केले होते. एक सोन्याचा दागिना मला मिळाला तो मी विकून त्याचे पैसे केले. इतर अशा रीतीने मिळणाच्या दागिन्यांची आम्ही अशीच वासलात लाऊन त्या पैशाने बाँब वगैरे साहित्य जमा करीत होतो. पुण्यास आल्यावर मला ब्रह्म- गिरीबुवा भेटले. प्र० – नाशिकप्रमाणेच पुण्याला एकादी गुप्त संस्था होती काय १ उ०- होय. उलट तपासणी-प्र० - टिळकाना या तुमच्या संस्थेविषयी काहीच माहिती नव्हती म्हणता? उ०- -नव्हती. आमच्या हालचाली प्रवास गुप्त भेटी व बाँब बगैरे साहित्याची जमवाजमव गैरकायदेशीर रीतीने पैसे उभारणे यापैकी एकाहि गोष्टीशी टिळकांचा काडीमात्र संबंध नव्हता.