पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० लो० टिळकांचे चरित्र भाग ४ तयार केल्या. चिरोल साहेबांच्या सांगण्यावरून मी त्यांना मदत केली. त्यांच्यावर जे संकट आहे ते माझ्यावरहि आहे असे मला वाटत नाही. कारण नुसत्या भाषां- तराने मी टिळकांची बेअब्रू काय करणार? माझे भाषांतर अस्सलाहून ठिक- ठिकाणी वेगळे व बरेच स्वैर आहे हे मी कबूल करतो. तसेच मुळात कित्येक ठिकाणी त्याला आधार नाही. टिळकांचे चित्र भी भडक रीतीने काढले अस- ल्याचा संभव आहे. मूळ इंग्रजी पुस्तकांत लजपतराय बिपिनचंद्रपाल महादेव गोविंद रानडे यांच्या पाठीमागे मिस्टर असे बहुवचनी उपपद आहे. तथापि अमक्याचा उल्लेख एकवचनी अमक्याचा बहुवचनी मी भाषांतरात का केला याचे कारण मला सांगता येणार नाही. प्र० - हे पहा डोंगरे थोडा वेळ लागला तरी घ्या. परंतु या ६०० पानांत टिळकांचा तुम्ही बहुवचनाने एकदा तरी कोठे उल्लेख केला असल्यास काढून दाखवा. उ०–मला असे करण्याची इच्छा नाही. प्र०—- तुमच्या भाषांतराचे पहिले पान काढा. चिरोल साहेबांची प्रत्यक्ष भीष्माशी तुम्ही तुलना केली आहे. याचा अर्थ काय तो सांगाल काय? उ०- भीष्म हा आजन्म ब्रह्मचारी असून एक शूर सेनापति होता. प्र० – अर्थात् युद्धाखेरीज इतर केव्हाहि त्याने कोणावर हात टाकला नसेल? उ० -ते मला काही माहीत नाही. पण प्रस्तावनेत मी चिरोल साहे- बांचा उल्लेख महानुभाव अगर महात्मा असा केला आहे. प्र० – विनाकारण अत्याचार करून मागाहून क्षमा मागण्याची पाळी येणारालाहि तुम्ही महात्माच म्हणाल काय? चिरोल साहेबाबरच हिंदुस्थानात १९०३ साली असा अतिप्रसंग केल्याबद्दल माफी मागण्याची पाळी आली होती है तुमच्या स्मरणात नाहीसे दिसते. उ०- तुम्ही म्हणता त्या प्रसंगाबद्दल मला माहिती नाही. वेदोक्ताबद्दल डोंगरे यानी कबूल केले की वेदोक्त प्रकरणात व्यक्तिशः छत्रपतीसरकारविरुद्ध टिळकानी लिहिल्याचे मला दाखविता येणार नाही. किंब- हुना शिवाजीच्या वंशजांना वेदोक्ताचा अधिकारच आहे असे टिळक म्हणत होते असे मला वाटते. जॉन वुइल्यम कंबल् सेक्रेटरी मिशन प्रेस मुंबई – यांची साक्ष झाली. १९१३ सालापूर्वी यांच्या संस्थेचा एक छापखाना कोल्हापुरला होता. कोल्हापूर- च्या छत्रपती सरकारची गुप्त पत्रे यांच्याच छापखान्यात छापविली गेली. हे सर्व काम डोंगरे यांचे मार्फत होऊन कीर्द खतावणी व ऑर्डर बुक् यामध्ये डोंगरे यांच्या नांवाची नोंद व कामाचा आकार आहे. याबद्दलच्या कोर्टापुढे असलेल्या नकला खऱ्या असल्याचे केबल यानी आपल्या साक्षीत सांगितले. रघुनाथ व्यंकटेश गोसावी हे नाशिकचे खटल्यात होते. त्यांच्या सा- क्षीचा सारांश असा—मित्रमेळ्याचा हेतु प्रथमतः आर्थिक व धार्मिक उन्नति करण्याचा होता. पण मागाहून हेतूमध्ये परिवर्तन होऊन सरकारचा सशस्त्र प्रति-