पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कमिशन पुढील पुरावा भास्करराव जाधव हे कोल्हापूर येथे १९०६ ते १९१० पर्यंत डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होते. त्यांच्या साक्षीचा सारांश असाः - या साक्षीत निशाणी ३६०-६१-६२ व ६३ या व इतर काही लेखांची भाषांतरे या खटल्याकरिता मीच तयार करून दिली. निशाणी ११ चे मि. बोवेन यांच्या सांगण्यावरून भाषांतर केले. बोवेन हे मला कागद देत व त्यांच्या नकला मी करीत असे. निशाणी ११ ही मात्र मला कोल्हापुरकडूनच मिळाली व हा महत्त्वाचा दस्तऐवज असल्यामुळे मी स्वतः तो कोल्हापुराहून घेऊन गेलो. चिरोल साहेब कोल्हापुरास आले तेव्हा दिवाण सबनीस यानी मला त्याना भेटावयास सांगितले. चिरोलसाहेबानी मला या खटल्यात मदत करण्यासंबंधी विचारले व मी त्यास कबूल केले. चिरोल साहेबाना मदत करीत असताहि मला माझा पगार व भत्ता नेहमीप्रमाणे मिळत होता. मी इतर कामेहि करीत होतो. भाग ४ प्रो० डोंगरे हे करंदीकर यांच्या उलट तपासणीत म्हणाले: -मला रावबहादूर ही पदवी १९१३ साली मिळाली. ती मिळण्याला सरकारची मी मोठीशी सेवा केली आहे असे नाही. लॉर्ड सिडेनहॅम यांच्या भाषणाची भाषांतरे मी केली आहेत. कोल्हापूर सरकारने या पुस्तकाचे कामी द्रव्यसाहाय्य केले. मी रावबहा- दूर होण्यापूर्वी चिरोल यांच्या पुस्तकाचे भाषांतर माझ्याकडून झाले. मी शाळा- खात्यातील अधिकारी असलो तरी शाळाखात्यासंबंधी अगर अस्पृश्य वर्गासंबंधी एकादे पुस्तक मी अजून लिहिले नाही. चिरोलसाहेबांच्या पुस्तकाचे भाषांतर करण्याला सुरवात केल्यापासून अवघ्या चार महिन्यात ते मी छापून प्रसिद्धहि केले. या पुस्तकाच्या ३०० प्रति कोल्हापूर सरकारने विकत घेतल्या. कोल्हापूर दरबार व त्यांचे अनेक संस्थानाधिपति मित्र यांनी मदत केल्यामुळे पुस्तकाचा खर्च भरून आला. पण इतकेहि करून २००० पैकी एक हजार प्रति शिल्लक राहिल्या व फायदा काडीचाहि झाला नाही. भाषांतराचे काम मी प्रो. लठ्ठे व जाधव वगैरेनी केले. परंतु त्याची सर्व जबाबदारी एकट्या माझेवरच आहे. प्रस्तावनेत स्वतःचा मी बहुवचनी उल्लेख केला आहे पण ते केवळ सवईने. टिळकांचा उल्लेख भी पुस्तकात एकवचनी केला आहे. मी स्वतः चिरोल साहेबाकडून भाषांतर केल्या- नंतर अगर ते प्रसिद्ध करण्यापूर्वी परवानगी विचारली नाही. कदाचित लठ्ठे यानी परवानगी मिळविली असेल पण अशा कामी परवानगीचे इतके महत्त्वच आहे असे आम्हाला वाटले नाही. चिरोल साहेब १९१६ च्या सुमारास कोल्हापूरला आले होते त्यावेळी माझ्या भाषांतराबद्दल मी त्याना बोललो नाही. त्याना ते परस्पर समजले असेल. या भेटीत साक्ष देण्याबद्दल चिरोल साहेबानी मला विचारिले व मी त्यास कबूल केले. मार्च १९१६ पासून सुमारे ७-८ महिने मी त्यास मदत करीत आहे व या सर्व मुदतीत मला कोल्हा- पूर दरबाराकडून वेतन मिळत आहे. खटल्याकरिता लागणारे उतारे मी काढले व स्वदेशी स्वराज्य शिवाजी उत्सव व राजद्रोही चळवळ या संबंधीच्या टिपणी