पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो. टिळकांचे चरित्र भाग ४ भेट दिली तेव्हा त्याना मी सदुपदेशाचा बोध केला व कायदेशीर रीतीने वाग- ण्याबद्दल निक्षून सांगितले. यापलीकडे त्यांचा माझा अधिक संबंध नव्हता. सवाल जवाब व कागदतपासणी उलटसुलट झाल्यावर पुराव्याकरिता कमिशन इकडे आले. कमिशनचे काम मि. खंडाळावाला यांच्यापुढे मुंबई हायकोर्टात चालू होते. टिळकातर्फे करंदीकर बखले वगैरे काम चालवीत होते. चिरोलसाहेबानी विनिंग हे बॅरिस्टर दिले होते. या साक्षी गुप्तपणे व्हाव्या की प्रसिद्धपणे व्हाव्या याची चर्चा होऊन कमिशनरने त्या गुप्तपणे व्हाव्या असा निकाल दिला. फक्त पक्षकार वकिल व त्यांचे कारकून इतक्यानाच हजर राहण्याची परवानगी देण्यात आली. प्रथम प्रतिवादीतर्फे त्रेचाळीस साक्षीदार तपासण्यात येऊन चारशे त्रेचाळीस निशाणीचे कागद दाखल करण्यात आले. त्यानंतर वादी टिळक यांच्यातर्फे अठरा साक्षीदार तपासण्यात येऊन एकशे एकोणचाळीस निशाणीचे कागद दाखल कर ण्यात आले. स्थूलमानाने सांगावयाचे तर प्रतिवादीचे साक्षीदारात केसरी काळ राष्ट्रमत या पत्रातील उताऱ्यांचे भाषांतर, कोल्हापूर येथील टिळकांची व्याख्याने टिळकांचे फोटो कोल्हापूर हद्दीतील घडलेले खरे खोटे राजकीय गुन्हे खुनाचे कट दरवडे यासंबंधाचे कागदपत्र दाखल करणारे लोक, नाशिक प्रकरणा- तील जॅक्सनच्या खुनासंबंधाने कबुल्या जायजबाब वगैरे कागद दाखल करणारे लोक, आणि चाफेकर बंधूंचे कबुलीजबाब वगैरे पुण्यातील प्रकरणासंबंधी कागद दाखल करणारे लोक असे होते. तसेच नाशिक प्रकरणातील कटाची हकिंकत सांगणारा गणू वैद्य भास्करराव जाधव (कोल्हापूरचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट) त्यांचे बंधू गोविंदराव जाधव आणि कोल्हापूर येथील माजी एज्युकेशनल इन्स्पेक्टर प्रो. डोंगरे असे मुख्य साक्षीदार होते. पण याशिवाय काळ पत्वासंबंधाने शिवराम महादेव परांजपे केसरी-मराठा संबंधाने केळकर आणि काही लोकांच्या ओळखी- संबंधाने टिळकांचे कारकून यशवंतराव कुलकर्णी इत्यादि लोकांच्याहि साक्षी झाल्या. टिळकातर्फे साक्षी झाल्या त्यात गोरक्षणसंबंधी कागदपत्र ज्ञानप्रकाश टाइम्स ऑफ इंडिया सुधारक हिंदुपंच या पत्रांचे अंक दाखल करणारे लोक, चिरोल साहेबाना सरकारची मदत कशा प्रकारची होत आहे हे दाखविणारे अधिकारी, काही मराठी पुस्तके दाखल करणारे लोक, टाईम्स पत्राने टिळकांची मागितलेली माफी शाबीत करणारा अंक दाखल करणारा टाईम्सचा नोकर, कोल्हापूरच्या महाराजानी छापविलेली काही गुप्त पुस्तके दाखल करणारे नगरचे मिशनरी छापखानेवाले इत्यादि होते. कमिशनच्या कामाला ता. ११ जुलै रोजी सुरवात झाली व ता. २९ ऑगस्ट रोजी कमिशनचे काम संपले. (३) कमिशनपुढील पुरावा कमिशनपुढे पुरावा झाला त्यातील काही भाग खाली दिला आहे.