पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पूर्व तयारी चिरोल यांच्या तर्फे टिळकाना जी सवालपट्टी काढण्यात आली तिजमध्ये अत्याचारासंबंधाने टिळकांच्या अंगी गुन्ह्याचा संपर्क व संसर्ग लावण्याच्या हेतूने जे प्रश्न विचारण्यात आले होते व त्यांची जी उत्तरे टिळकानी लेखी दिली ती याखाली दिली आहेत. भाग ४ प्र० – १९०५ किंवा १९०७ साली कोल्हापूर येथे शिवाजी क्लबाच्या सभाना तुम्ही हजर होता की नाही? उ०-या शिवाजी क्लवाच्या सभाना मी कधीहि हजर नव्हतो. प्र० – कोल्हापूरच्या प्रसादे व पाध्ये या नावांच्या मनुष्याना कोल्हापुरास १९०७ साली मे जूनच्या सुमारास शिक्षा झाली होती की नाही? आणि त्यांचा व तुमचा एकत्र फोटो काढलेला आहे की नाही? उ०: - माझी व प्रसादे आणि पाध्ये यांची ओळख नाही. आणि त्याना शिक्षा झाली की नाही हेहि मला माहीत नाही. इतर अनेक मंडळीसह माझे शेकडो ठिकाणी फोटो काढण्यात आलेले आहेत. त्यापैकी एकाद्यात प्रसादे व पाध्ये असतील की नाही हे मी कसे सांगू? अशा प्रकारचा फोटो मला अद्याप कोणी दाखविलेला नाही. प्र० - विजापूरकर याना कोल्हापूर येथे १९०९ साली शिक्षा झाली होती की नाही? आणि त्यांचा व तुमचा एकत्र फोटो काढलेला आहे की नाही? तसेच त्यांचा व तुमचा स्नेह होता की नाही? उ०—– विजापूरकरांचा व माझा चांगला परिचय आहे. त्यांचा व माझा एकाद्या ठिकाणी एकत्ल फोटो काढलेला असेल. तो दाखविल्यास मो नक्की सांगेन. १९०९ साली मी मंडाले येथे होतो व त्यासाली त्याना शिक्षा झाली होती असे मी १९१४ साली परत आल्यावर ऐकिले. प्र० बी. जी. मोडक याला १९११ साली कोल्हापुरास व १९०९ साली मुंबईस शिक्षा झाली की नाही? त्यांचा व तुमचा एकत्र फोटो काढलेला आहे की नाही? उ०- -मोडकांची माहिती आहे. एकत्र फोटो काढल्याचे लक्षात नाही. दाखविल्यास सांगू शकेन. त्याना शिक्षा झाली हेहि मी १९१४ साली सुटून आल्यावर ऐकिले. प्र०—सावरकर भट वगैरे मंडळी नाशिक येथील मित्रमेळ्याचे १९०५ साली सभासद होते की नाही १ १९०९ साली त्याना शिक्षा झाल्या की नाही? १९०६ साली तुम्ही नाशिकास गेला तेव्हा त्या मेळ्यापुढे काही व्याख्याने दिली की नाही? व या लोकाशी संबंध ठेविला की नाही? उ० – १९०६ साली मी नाशिकास गणपतीउत्सवाकरिता गेलो होतो व तेथे हिंदु मुसलमान समाजापुढे व्याख्याने दिली. मित्रमेळ्याकडे पानसुपारीला गेलो होतो. व्याख्यानाकरिता नाही. त्यावेळी सावरकर भट यापैकी कोणासहि शिक्षा झाली नव्हती. अमुकच लोक मित्रमेळ्याचे सभासद होते अगर नव्हते हे मला नक्की सांगता येणार नाही. त्याना शिक्षा झाल्याचे मी १९१४ साली ऐकिले. नाशिकास मी मित्रमेळ्याला