पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ लो. टिळकांचे चरित्र भाग ४ आहे की "तुमच्या पुस्तकात टिळकाना बदनामीकारक असा मजकूर आला आहे. त्यातील जो भाग खरा किंवा जी टीका रीतीची असेल तिच्याबद्दल त्यांचे काही म्हणणे नाही. पण त्यातील अनेक विधाने खोटी आहेत. म्हणून त्यासंबंधाची टीका निराधार आहे. टिळक तुरुंगात असल्याकारणाने त्याना या पुस्तकाचा प्रतिकार यापूर्वी करता आला नाही. म्हणूनच ही नोटीस देण्याला इतका उशीर झाला." यानंतर सॉलिसिटर यानी ५१६ सदराखाली पुस्तकातील वेअब्रुकारक विधाने निर्दिष्ट केली आहेत व पुढे असे लिहिले आहे की "तुमच्याविरुद्ध फिर्याद करावी लागली तर त्यात नुकसानभरपाईदाखल स्वतःकरिता रकम मिळवावी असा टिळकांचा हेतू नाही. तर फक्त त्यांच्यावर आणलेल्या बेअब्रुकारक विधानांचे व त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या प्रतिकूल लोकमताचे परिमार्जन करावे इतकाच आहे. तरी तुम्ही खाली लिहिलेल्या गोष्टी मान्य करण्यास तयार आहा की नाही कळवावे. १. उपरिनिर्दिष्ट विधाने परत घ्यावी व ती केल्याबद्दल आम्ही सांगू त्या रीतीने टिळकांची माफी मागावी व आम्ही सांगू त्या वर्तमानपत्रात ती छापावी. २. वरील विधानांच्या दुरुस्त्या व माफी ही त्यात लक्षात येण्यासारख्या जागी घातल्याशिवाय पुस्तकाची विक्री यापुढे करू नये. ३. तुमच्या आमच्या विचारे ठरेल ती रक्कम तुम्ही इंडियन वॉररिलीफ फंडाला द्यावी. तुमचे पुस्तक छापून प्रसिद्ध होऊन बरेच दिवस झाले. म्हणून टिळक हे तुम्हाला मुदत देण्याला तयार आहेत. पण तीन आठवड्यांच्या आंत तुम्ही समाधानकारक उत्तर न दिले तर आम्ही लंडन येथील न्यायकोर्टात रीतसर फिर्याद मांडू. यावर चिरोल साहेबांच्या सॉलिसिटरनी समाधानकारक उत्तर न दिल्याने टिळकांच्या सॉलिसिटरनी ता. २७ आक्टोबर १९१६ रोजी समन्स मागितले. व ता. १४ नव्हंबर रोजी फिर्याद दाखल केली. त्यावर ता. ३ मार्च १९१६ रोजी कैफियत दाखल झाली. पुढे बरेच दिवसपर्यंत उभयपक्षांच्या सॉलिसिटर्समध्ये उलट सुलट लेखी प्रश्न विचारले गेले. पुराव्यात दाखल करण्याच्या कागदासंबंधाची माहिती व प्रत्यक्ष कागदपत्रहि एकमेकास देण्यात आले. या कामाला बरेच दिवस लागले. कारण भाषांतराचे कागद पुष्कळ होते. वर निर्दिष्ट केलेल्या सवालपट्टया व कागद पाहणे दाखविणे यांचा हेतू असा असतो की एकमेकांच्या कबुल्यानी जितके मुद्दे उडून जातील तितके जावे आणि कबुल्यानी उडून न जाणारे असे जितके मुद्दे उरतील तितक्याच गोष्टी पुराव्याने कोर्टात प्रत्यक्ष शाबित व्हाव्या. टिळकाना चिरोल साहेबाकडून आलेली सवालपट्टी फिर्याद दाखल झाल्यापासून सुमारे दीड वर्षाने बजावण्यात आली. त्याला टिळकांची उत्तरे लवकरच गेली. तथापि इकडे पुराव्यासाठी कमिशन येऊन परत जाऊन सर्व कागदपत्र छापून झाल्यानंतर कोर्टाच्या सोयीप्रमाणे तारीख लागली त्याला १९१९ साल उजाडले.