पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ पूर्व तयारी दाखल करण्यावर. या पत्रातील लेखानी अस्वस्थतेचे वातावरण निर्माण केले आणि त्या वातावरणामुळे खून झाले असे चिरोलसाहेब दाखवू पाहणार! पण हा शुद्ध दूरान्वय होय. कमिशन आल्याने एक तऱ्हेची अडचण मात्र होईल. ती अशी की लागू गैरलागू याविषयी हरकत आम्ही घेऊ पण हुजत घालावी लागणार. आणि कमिशनर म्हणेल की फक्त पुरावा दाखल करून घेण्याचे काम माझे. ग्राह्या- ग्राह्य ते कोर्ट पाहील. मी तुम्हाला ६०० पौंड पूर्वीच पाठविले आहेत. कमिशन निघालेच तर तुमचा कोणी प्रतिनिधी येण्याची गरज आहे की नाही हे मी अजून ठरविले नाही. " वरील उताऱ्यावरून टिळकांची खटल्याविषयी कल्पना काय होती हे कळून येईल. पण या बाबतीत जसा त्यांचा अदमास चुकला तसा खर्च किती लागेल याहि बाबतीत तो चुकला. कमिशन नेमले जाणार नाही आणि स्वतः टिळक ज्यूरीपुढे जाऊन हजर झाले म्हणजे नुसते वर्तमानपत्रांचे अंक दाखल करणे इतकेच काम उरेल अशी त्यांची समजूत असावी. पण ती चुकीची ठरली. प्रिव्हि कौन्सिलकडे अपिले जातात त्यावरून विलायतच्या खर्चाचा अंदाज कोणी सांगितला असेल, पण हे काम अपिलाचे नसून अव्वल मुकदम्याचे पुरा- व्याचे कमिशनचे असे होते. टिळकांच्या मुंबईच्या सॉलिसिटरनी कमिशनच्या खचीचा अंदाज सुमारे सहा हजार रुपये इतकाच केला होता. तात्पर्य फार तर पाऊण लाख रुपयेपर्यंत एकंदर तयारी ठेवली म्हणजे खर्चाचे कलम भागेल असे टिळकाना वाटत होते. पण अशा खटल्याचा अनुभव कोणालाच नसल्याने हिशेब चुकला आणि प्रत्यक्ष खर्च तीन लक्ष आला! चिरोलसाहेबांच्या पुस्तकातून वेअनुकारक म्हणून टिळकानी सुमारे तीस वाक्ये निवडून काढली होती. ती अर्थात सर्व सारख्याच दर्ज्याची नव्हती. काहीत बेअब्रु उघड तर काहीत ती प्रछन्न होती. काहीत स्पष्टोक्ती तर काहीत व्यंग्यार्थ होता. काहीत अत्याचारासारख्या गुन्ह्याशी टिळकांचा संबंध जोडण्यात आला होता तर काहीत त्यांच्या खासगी चारित्र्यावर अप्रामाणिकपणाच्या आरोपाचे शिंतोडे उडविले होते. पुढे चिरोल साहेबांच्या बॅरिस्टरानी मधून मधून टिळकाना असे विचारलेच की "अहो हे पाहिलेत का पुस्तकातील वाक्य? यात तुम्हाला नावे ठेविली आहेत. पण तुम्ही च्याविषयी तक्रार केली नाहीत व त्याविषयी मुद्दा काढविला नाहीत. तर मग असेच समजावयाचे काय की तुम्ही वगळलेल्या या व अशा वाक्यातून जी तुमची निंदा करण्यात आली आहे ती तुम्हाला मान्य आहे? तिच्याविषयी तुमची काही तक्रार नाही? " पण कोणती वाक्ये घ्यावी हे ठरविणे एक प्रकारे कठीणच होते. कारण कार घेतली तर ते जसे बाधक तसेच थोडी घेतली तर तेहि बाधक होणार होते. म्हणून टिळकानी मध्यम मार्ग स्वीकारला. टिळकांच्यातर्फे त्यांचे सॉलिसिटर डौनर जॉनसन यानी ता. १ आक्टो- बर १९१५ रोजी चिरोलसाहेबाना फिर्यादीची नोटीस दिली. तीत असे लिहिले टि० उ... १८